Jennifer Winget: जेनिफर विंगेटचे 'या' अभिनेत्यासोबत जोडले जात आहे नाव

टीव्ही अभिनेत्री जेनिफर विंगेटने अलीकडेच तिचा 'कोड एम' सहकलाकार तनुज विरवानीसोबत तिचा 37 वा वाढदिवस साजरा केला.
Jennifer Winget: जेनिफर विंगेटचे 'या' अभिनेत्यासोबत जोडले जात आहे नाव
Jennifer WingetDainik Gomantak

टीव्ही अभिनेत्री जेनिफर विंगेटने अलीकडेच तिचा 'कोड एम' को-स्टार तनुज विरवानीसोबत तिचा 37 वा वाढदिवस साजरा केला. तेव्हापासून दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या सोशल मिडीयावर (Social Media) येत आहेत. आता अखेर जेनिफरने तनुजसोबतच्या डेटींगच्या अफवांवर आपले मौन तोडले आहे.

जेनिफरने (Jennifer Winget) एके वृत्ताला माहिती दिली की, "तो मला अजिबात त्रास देत नाही कारण जोपर्यंत मला माझे सत्य माहित आहे, माझ्या कुटुंबाला सत्य माहित आहे, माझ्या मित्रांना आणि चाहत्यांना माझे सत्य माहित आहे, तेच माझ्यासाठी महत्त्वाचे आहे." ती पुढे म्हणाली, "मी एक सार्वजनिक व्यक्तिमत्त्व आहे. लोकांचे माझ्याबद्दल त्यांचे मत आणि निर्णय असेल आणि ते चांगले आहे. जोपर्यंत ते माझ्या कामाचा आणि सीमांचा आदर करतात तो पर्यंत मी त्यांच्यासोबत ठीक आहे. मला तो त्रास देत नाही.

* कोड एम सीजनमध्ये एकत्र केले काम

जेनिफर आणि तनुज नुकतेच एकता कपूरच्या कोड एम सीझन 2 मध्ये एकत्र ऑनस्क्रीन केम करतांना दिसले होते. वेब सीरिजच्या (Web Series) दुसऱ्या सीझनमध्ये त्यांचे प्रेमसबंध कसे विकसित झाले याबद्दल बोलताना जेनिफर म्हणाली, “आमचे नांत सीझन 1 पासून आतापर्यंत मजबूत झाले आहेत. त्याच्यासोबत राहून खूप मजा येते. सेटवर कधीही कंटाळवाणे वाटले नाही."

Jennifer Winget
Photo: अनुष्का शर्माने मालदीवरून शेअर केला बोल्ड फोटो

गेल्या वर्षी एका चॅट शोमध्ये, तनुजला जेनिफरसोबतच्या त्याच्या रिलेशनशिपबद्दल (Relationship) विचारण्यात आले होते, तसेच त्यांच्या रिलेशनशिपबद्दल वारंवार बोलले जात असताना पत्रकार परिषदेत त्याच्या एका व्हिडिओबद्दल (Video) देखील विचारण्यात आले होते. जेनिफरला "प्रिय मित्र" आणि "आवडती महिला सह-कलाकार" असे वर्णन करताना, तनुजने सांगितले की ते डेटिंग करत नाहीत.

"आम्ही खूप चांगले मित्र आहोत. आणि तुम्ही ज्या व्हिडिओचा विचार करत आहात तो व्हॅलेंटाईन डेला अचानक काढला गेला आहे. कारण आम्ही एका कार्यक्रमात एकत्र गेलो होतो. जेनिफर आतापर्यंत माझी आवडती फीमेल को-स्टार आहे. ."

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com