ईदला होणार सलमान आणि जॉन च्या चित्रपटांची टक्कर

गोमंन्तक वृत्तसेवा
बुधवार, 27 जानेवारी 2021

जॉनचा सत्यमेव जयते या चित्रपटाचा दुसरा भाग येणार आहे आणि सलमान खानचा राधे द मोस्ट वॉटेड भाई हे दोन्ही चित्रपट ईदच्या दिवशीचीच प्रदर्शित होणार आहे.

मुंबई: एका बाजूला बॉलीवूडचा भाईजान सलमान खान तर दुसरीकडे आपल्या जबरदस्त अॅक्शनसाठी ओळखला जाणारा हिरो म्हणून जॉनचे अब्राहम या अभिनेत्याचे नाव आपल्या ओठांवर येते. यावर्षी या दोन्ही कलाकारांचे एकाच दिवशी चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने प्रेक्षक कोणत्या चित्रपटाला अधिक प्रतिसाद देतील हे बघणे आश्चर्याचे असणार आहे. या दोन्ही अभिनेत्यांचा फन्स फॉलोअर्स प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. तेवहा हे दोन्ही अभिनेते सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असतात. त्यांचा प्रदर्शित होणारा प्रत्येक चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई करणारा असतो. तेवहा येणाऱ्या काळात कोण कुठल्या स्थानावर असणार याची उत्सुकता वाढली आहे.

जॉनच्या सत्यमेव जयते या चित्रपटाचा दुसरा भाग आणि सलमान खानचा राधे द मोस्ट वॉटेड भाई हा चित्रपट एकाच देवशी प्रदर्शित होणार आहे. हे दोन्ही चित्रपट एकमेकांना टक्कर देणारे ठरणार आहे. राधे ही एक अॅक्शन फिल्म असून त्या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभुदेवाने केले आहे. आणि विशेष म्हणजे हे दोन्ही चित्रपट ईदच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे. जॉनने आता सत्यमेव जयते 2 च्या प्रदर्शनाची तारीख ईदच्या दिवशीचीच आहे. यंदाच्या बिग बजेटमध्ये चित्रपट म्हणून या चित्रपटांचे नाव नक्कीच घ्यावे लागेल असे चित्र दिसत आहे. सलमान खानचा या वर्षातला हा पहिला चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सलमानने यापूर्वी रीलीज डेट चे पत्रक सोशल मीडियावर प्रसिध्द केले होते.

जॉनने त्याच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर एक फोटो शेयर केला आहे ज्यात तो हातात तिरंगा घेऊन दिसतो आहे.  "तन मन आणि धनपेक्षा सर्वात मोठे अस जन गण मन, आहे. जय हो, सत्यमेव जयते 2 टीमला गणतंत्र दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आता आपली भेट 14 मे 2021 मध्ये होणार," असे कॅप्शन जॉनने आपल्या पोस्टला दिले आहे. सत्यमेव जयते या चित्रपटाचे दिग्दर्शन मिलाप जवेरीने केले असून ही पण एक अॅक्शन फिल्म असणार आहे. यात जॉन हा विरेंद्र राठोडच्या भूमिकेत दिसणार आहे. तर या चित्रपटात दिव्या खोसला कुमार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सत्यमेव जयतेच्या सिक्वेलमध्ये मनोज वाजपेयीची सुध्दा झलक प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. 

सलमानचा राधे मोस्ट वॉंटेड भाई हा चित्रपटही ईदलाच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सलमानच्या जोडीला दिशा पटानी, जॅकी श्रॉफ आणि रणदीप हुडा हे महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट मागच्याच वर्षी प्रदर्शित होणार होता, मात्र कोरोनामुळे या चित्रपटाची रीलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती. पण आता ईद च्या उत्सवात हा चित्रपट धडाक्यात बॉक्स ऑफिसवर एंट्री मारणार आहे. याआधी अक्षय कुमार आणि जॉन या दोघांचे चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले होते. जॉनचा सत्यमेव जयते आणि अक्षय कुमारचा रुस्तूम या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफीसवर धमाल केली होती. रूस्तम चित्रपटाच्या गाण्यांचे आणि सत्यमेव जयते या चित्रपटातील अॅक्शनचे प्रेक्षक दिवाने झाले होते. या दोन्ही चित्रपटांनी चांगलीच कमाई केली होती. तेव्हा आता या येणाऱ्या ईद ला सलमान आणि जॉन काय जादू करणार हे बघण्यासाठी चाहतेवर्ग उत्सुक आहे.

संबंधित बातम्या