5G Technology: जूही चावला भारतातील 5 जी तंत्रज्ञानाविरूद्ध

गोमंन्तक वृत्तसेवा
सोमवार, 31 मे 2021

बॉलिवूड(Bollywood) अभिनेत्री जूही चावला(juhi chawla) प्रत्येक विषयावर आपले मत व्यक्त करते. ती लोकांना सुरक्षितता, स्वच्छता आणि इतर महत्वाच्या गोष्टींबद्दल जागरूक करते. यावेळी तिने एका अशाच मुद्याला हात घातला आहे.

मुंबई: बॉलिवूड(Bollywood) अभिनेत्री जूही चावला(juhi chawla) प्रत्येक विषयावर आपले मत व्यक्त करते. ती लोकांना सुरक्षितता, स्वच्छता आणि इतर महत्वाच्या गोष्टींबद्दल जागरूक करते. यावेळी तिने एका अशाच मुद्याला हात घातला आहे. लवकरच भारतात 5G तंत्रज्ञान लागू होणार आहे. त्याचा पर्यावरणावर तसेच लोकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होणार आहे. यासाठी जुही चावला बर्‍याच काळापासून 5 जी मोबाइल टॉवरमधून निघणाऱ्या हानिकारक रेडिएशनविरूद्ध लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत होती. तीने याविरोधात गुन्हादेखील दाखल केला असून त्यासाठी आज पहिली सुनावणी होणार होती. पण आता बातमी येत आहे की, अभिनेत्रीची याचिका दुसर्‍या खंडपीठाकडे स्थलांतरीत करण्यात आली असून आता त्यावर 2 जून रोजी सुनावणी होणार आहे.

माझं प्रेम शोधतेय राखी सावंतचा भन्नाट व्हिडिओ होतोय व्हायरल 

जुही चावलाने  दाखल केलेल्या या याचिकेमध्ये अशी मागणी केली आहे की 5 जी तंत्रज्ञानाची अंमलबजावणी होण्यापूर्वी त्यासंबंधित सर्व प्रकारच्या अभ्यासाकडे बारकाईने लक्ष दिले पाहिजे आणि त्यानंतरच भारतात या तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करण्याची कल्पना केली पाहीजे. या याचिकेमध्ये जूही चावलाने भारत सरकारच्या टेलिकॉम मंत्रालयाला 5 जी तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीचा सामान्य लोक, सर्व प्राणी, वनस्पती आणि जीव-जंतुंवर होणाऱ्या दुष्परिणामांशी निगडीत अभ्यास करण्यास सांगितले आणि येणाऱ्या अहवालांच्या आधारेच भारतात 5Gनेटवर्कची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घ्या असे म्हटले आहे.

टार्झन स्टार जो लारा यांचा 58 व्या वर्षी विमान अपघातात मृत्यू 

या प्रकरणाबद्दल बोलतांना अभिनेत्री जुही चावला म्हणाली, 'आम्ही प्रगत तंत्रज्ञानाविरूद्ध नाही. आम्हाला नवीन तंत्रज्ञान देणारी नवीनतम उत्पादने वापरण्यात आनंदच झाला आहे. वायरलेसच्या क्षेत्रातही भारताने मोठी प्रगती केली आहे, मात्र आम्हाला अडचण ही आहे की, आपले संशोधन, वायरफ्री गॅझेट्स आणि नेटवर्क सेल टॉवर्स संबंधित अभ्यास करणे गरजेच आहे. कारण अशा किरणोत्सर्गाचा लोकांच्या आरोग्यावर परिणाम होवू शकतो. ही किरणं मानवाच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत हानिकारक आहेत. तेव्हा विचारपूर्वक अभ्यास करून देशात 5G नेटवर्क आणावे'
 

संबंधित बातम्या