52व्या इफ्फीमधल्या स्पर्धा विभागाचे ज्युरी मंडळ
International Film Festival of IndiaDainik Gomantak

52व्या इफ्फीमधल्या स्पर्धा विभागाचे ज्युरी मंडळ

यंदाच्या 52 व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवासाठी (International Film Festival of India) सक्षम अशा ज्युरींची निवड केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण खात्याकडून झालेली आहे.

यंदाच्या 52 व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवासाठी (International Film Festival of India) सक्षम अशा ज्युरींची निवड केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण खात्याकडून झालेली आहे. प्रख्यात ईराणी चित्रपट (Film) दिग्दर्शिका रख्शान बेनितेमेद या ज्युरी मंडळाच्या अध्यक्षपदी आहेत. जगातल्या साऱ्या महत्त्वाच्या चित्रपट महोत्सवात आपली नाममुद्रा कोरणाऱ्या रख्सान यांचे चित्रपट समीक्षकांबरोबरच सामान्य प्रेक्षकांतही लोकप्रिय आहेत. वेनिस, बुसान, शांघाय, मॉस्को, मॉन्ट्रियल इत्यादी महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आतापर्यंत त्यांनी ज्युरी म्हणून काम पाहिले आहे. एक स्त्री चित्रपट दिग्दर्शक म्हणून त्यांचे विशेष स्थान आंतरराष्ट्रीय चित्रपट क्षेत्रात प्रस्थापित झालेले आहे.

ज्युरी मंडळाचे इतर सदस्य आहेत:

 स्टीवन वूली (65 वर्षे) ब्रिटन, चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक,

 सिरो गुयेरा (40 वर्षे) कोलंबिया, चित्रपट दिग्दर्शक

 विमुक्ती जयसुंदरा (44 वर्षे) श्रीलंका, चित्रपट दिग्दर्शक

 नीला माधब पांडा (47 वर्षे) भारत, चित्रपट दिग्दर्शक

कोलंबियाचे सिरो गुयेरा हे या ज्युरी मंडळात वयाने सर्वात लहान सदस्य आहेत. 2015 सालच्या ‘एम्ब्रेस ऑफ दि सर्पंट’ या त्यांच्या चित्रपटामुळे गुयेरा सर्व परिचित झाले. 88 व्या ऑस्करमध्ये त्यांच्या ह्या चित्रपटाला ‘परदेशी भाषा’ विभागात उत्कृष्ट चित्रपटासाठी नामांकन लाभले होते. 2019 साली कान चित्रपट महोत्सवात ते एका विभागाच्या ज्युरी मंडळाचे अध्यक्ष होते.

International Film Festival of India
गोव्याच्या सिनेनिर्मात्यांना ‘फायनान्स’ द्या

स्टीवन वूली यांना 2019 साली, ब्रिटिश चित्रपटांना त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल बाफ्ता पुरस्कार लाभला आहे. ‘नंबर 9 फिल्म’ ही त्यांची चित्रपट निर्मिती कंपनी आहे. विमुक्ती जयसुंदरा हे श्रीलंकेचे असले तरी त्यांनी चित्रपट निर्मितीचे शिक्षण पुण्यातल्या ‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’मधून घेतलेले आहे. 2005 साली ‘सुलंगा एनु विनिसा’ या त्यांच्या चित्रपटाला ‘कान चित्रपट महोत्सवा’त गोल्डन पुरस्कार लाभला होता. 2011 सालच्या कान चित्रपट महोत्सवात त्यांचा ‘चत्रक’ हा चित्रपट डायरेक्टर्स फॉर्टनाईट विभागात दाखवण्यात आला होता.

नीला माधब पांडा हे भारतीय चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक आहेत. आतापर्यंत त्यांनी लघुपट, माहितीपट इत्यादी मिळून सुमारे 70 चित्रपटांची निर्मिती केली आहे. वातावरण बदल, बालमजुर, शिक्षण, जलसमस्या, स्वच्छता असे विषय आपल्या चित्रपटांमधून त्यांनी हाताळले आहेत. 2012 सालच्या त्यांच्या ‘जलपरी’ या चित्रपटाला कान चित्रपट महोत्सवात उत्कृष्ट चित्रपटासाठी ‘एमआयपी ज्युनियर पुरस्कार’ लाभला होता. भारतातल्या आणि जगभरच्या इतर महत्त्वाच्या चित्रपट महोत्सवातही त्यांच्या चित्रपटांचा सन्मान झालेला आहे. हे ज्युरी मंडळ यंदाच्या इफ्फीमधल्या स्पर्धा विभागातल्या 15 चित्रपटांचे परीक्षण करणार आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com