Rick and Morty : रिक आणि मॉर्टीच्या जस्टिन रोयलंडला 7 वर्षांपर्यंत तुरुंगवास?

हॉलिवूडमधून एक मोठी बातमी आली आहे, एका आरोपाखाली जस्टिन रोयलंडला 7 वर्षांची शिक्षा होऊ शकते..
Justin Roiland
Justin RoilandDainik Gomantak

हॉलिवूड ही एक मोठी इंडस्ट्री आहे, कित्येक मोठमोठे चित्रपट आणि प्रचंड मोठी आर्थिक उलाढाल ही जगभरातल्या बाकीच्या चित्रपटांसाठी एक भव्य-दिव्य स्वप्नच असतं.

या सगळ्यात बऱ्याचदा कला आणि व्यक्तिगत आयुष्य या सगळ्याचा मेळ बसत नाही. पडद्यावर दिसणारा एखादा मानवतावादी कलाकार प्रत्यक्षात तसा असेलच असं नाही.

गेल्या काही काळात हॉलिवूडमधून काही धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी 'जॉनी डेप'च्या डिव्होर्सचे आणि त्याची पत्नी अॅंबर हर्डचे आरोप यावरुन वातावरण चांगलंच तापलं होतं. आता एक नवीन प्रकरण समोर आलं आहे.

" रिक अँड मॉर्टी " या चित्रपटाने फेमस झालेल्या जस्टिन रॉयलँडवर घरगुती हिंसाचाराचा आरोप करण्यात आला आहे. हे प्रकरण 2020 मध्ये रॉयलँडच्या मैत्रिणीशी घडलेल्या एका घटनेशी संबंधित आहे. 42 वर्षीय रॉयलँड या प्रकरणात दोषी आढळल्यास त्याला 7 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते अशी शक्यता निर्माण झाली आहे.

जस्टिन रॉयलँडच्या विरोधात घरगुती हिंसाचार प्रकरण दक्षिण कॅलिफोर्नियातील ऑरेंज काउंटी डिस्ट्रिक्ट अॅटर्नीने मे 2020 मध्ये दाखल झाले होते.

.पण हे आरोप होत असताना रोयलँडने दोन आरोपांसाठी दोषी नसल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर गुरुवारी रॉयलँड न्यायालयात खटल्याच्या पूर्व सुनावणीला उपस्थित होता.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना जानेवारी 2020 मध्ये घडली होती. रोयलँडवर घरगुती हिंसाचार, शारीरिक दुखापत, फसवणूक असे आरोप करण्यात आले होते.

पोलिस तक्रारीत असा दावा करण्यात आला आहे की रोयलँडच्या हिंसक कृत्यांमुळे महिला अत्यंत वाईट स्थितीत होती.

Justin Roiland
Urfi Javed ला अंगप्रदर्शन केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी बजावली नोटीस

ऑगस्ट 2020 मध्ये, रॉयलँडला अटक करण्यात आली परंतु नंतर $50,000 च्या बाँडवर सोडण्यात आले. ऑक्टोबर 2020 मध्ये, त्याने गुन्हा कबूल न करण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतर, रॉयलँडच्या विरोधात संरक्षणात्मक आदेश दाखल करण्यात आला. 

संरक्षणात्मक आदेशानुसार, रॉयलँडला तक्रार केलेल्या महिलेपासुन 100 फूट अंतर राखण्याचे निर्देश देण्यात आले होते त्याचबरोबर तक्रार देणाऱ्या व्यक्तीला त्रास देऊ नये किंवा कोणतीही धमकी देऊ नये अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

गुरुवारी रॉयलँड कोर्टाच्या सुनावणीला उपस्थित होते. पुढील सुनावणी 27 एप्रिल 2023 रोजी होणार आहे. रॉयलँड यांना सुनावणीला उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महिलेने केलेले आरोप जर सिद्ध झाले तर या प्रकरणी जस्टीन रॉयलँडला 7 वर्षांची शिक्षा मिळेल हे मात्र नक्की.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com