के. एल राहुल आणि अथिया इंग्लंडमध्ये एकत्र; फोटो होतोय व्हायरल

दैनिक गोमंतक
गुरुवार, 10 जून 2021

नुकताच अथिया शेट्टीने ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाइट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

टीम इंडियाचा प्रसिध्द क्रिकेटपटू के.एल राहुल (K.L. Rahul) आणि अभिनेता सुनील शेट्टी (Sunil Shetty) यांची मुलगी अथिया शेट्टी (Athiya Shetty) यांच्या प्रेमसंबंधाच्या सोशल मिडियावर (Social media) चांगल्याच चर्चा रंगू लागल्या आहेत. दोघेही सोशल मीडियावर एकमेकांचे फोटो शेअर करत असतात. दोघेही एकमेकांचे चांगले मित्र आहोत असे ते मानतात. अशा परिस्थितीतच आता आथियाने सोशल मिडियावरील इंस्टाग्रामवर एक लेटेस्ट  फोटो पोस्ट केला आहे, ज्यामुळे  आता पुन्हा एकदा या दोघांच्या नात्याबद्दल चर्चा करण्यात येत आहे. दरम्यान, टीम इंडिया (Team India)आपल्या सहकारी आणि कुटुंबासमवेत इंग्लंडला रवाना झाला आहे. अशातच अथियाने सोशल मिडियावरील इन्स्टाग्रामवर  एक फोटो पोस्ट केला असून, या फोटोनंतर अथिया इंग्लंडमध्ये (England) असल्याचे प्रथमदर्शनी कळून येत आहे. 

तसेच, नुकताच अथिया शेट्टीने ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाइट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.  हा  फोटो शेअर करत अथियाने  'तुमची एनर्जी वाचवा' असे मजेदार कॅप्शन दिले आहे. परंतु अथियाच्या या एका फोटोवरुन तिच्या एका चाहत्यांनी प्रश्न विचारला, 'तु इंग्लंडमध्ये के.एल राहुल सोबत आहेस का? अथियाचा हा फोटो सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाला. हा फोटो पाहून चाहत्यांकडून असा अंदाज  वर्तवण्यात येत आहे की, अथिया सध्या तिच्या  प्रियकरासोबत इंग्लंडमध्ये आहे. अशातच चाहते केवळ त्यांच्या सोशल मीडियावरील फक्त फोटोचचं कौतुक करत नसून त्यावर चर्चा देखील करत  आहेत. 

पहिल्याच नजरेत पडले होते प्रेमात; रियल लाइफ Love Story

नुकतच के.एल राहुलच्या 29 व्या वाढदिवसानिमित्त अथियाने एक सोशल मिडियावर फोटो शेअर करुन के.एल राहुलला शुभेच्छा दिल्या होत्या .अथियाच्या या पोस्टवर तिचे वडील सुनील शेट्टी यांनीही पोस्टवर कमेंट केली होती. अथियाने 'हीरो' या चित्रपटातून सूरज पंचोलीबरोबर बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. यानंतर अथिया 'मोतीचूर चकनाचूर'चित्रपटामधून नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत दिसली होती .

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

<

संबंधित बातम्या