Kajol's Memory Of Fanaa : जेव्हा मायनस 27 डिग्रीच्या हाडं गोठवणाऱ्या थंडीत काजोलनं हे गाणं शूट केलं होतं....

अभिनेत्री काजोल आणि आमिर खानचा फना हा चित्रपट आजही काजोलसाठी स्पेशल आहे, तिने या चित्रपटाची एक आठवण शेअर केली आहे.
Kajol's Memory Of Fanaa
Kajol's Memory Of FanaaDainik Gomantak

अभिनेत्री काजोल तिच्या बिनधास्त वागण्या - बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे. काजोलने तिच्या पूर्ण करिअरमध्ये वेगवेगळ्या भूमीकांमधून चाहत्यांचे मनोरंजन केलं आहे.

तसं पाहता काजोल आणि शाहरुख खानची एक स्पेशल केमिस्ट्री आहे ;पण एका चित्रपटात काजोलशी आमिर खानची सुपरहिट केमिस्ट्री पाहायला मिळाली. आज या चित्रपटाला बरीच वर्षे पूर्ण झाली.

काजोल आणि आमिर खानचा चित्रपट 'फना' रिलीज होऊन 17 वर्षे झाली आहेत. यावेळी काजोलने या चित्रपटाच्या शूटिंगशी संबंधित एक अशी आठवण सांगितली की, ती ऐकून तुम्हाला धक्का बसेल. काजोलने सांगितले की, या चित्रपटाचे एक गाणे मायनस 27 डिग्री तापमानात शूट करण्यात आले होते. तलावाचे पाणी गोठले होते आणि कडाक्याच्या थंडीत फक्त शिफॉनचा सलवार सूट घातला होता. काजोलची ही पोस्ट सोशल मीडियावर लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.

आमिर खान आणि काजोलच्या 'फना' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. या दोघांची केमिस्ट्रीही चाहत्यांना या चित्रपटात आवडली होती. 17 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाबद्दल काजोलने सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे. यामध्ये तिने हेही सांगितले की, जुनीचे पात्र त्याच्यासाठी नेहमीच खास असेल.

काजोलने या पोस्टमध्ये पुढे सांगितले की, 'शुटिंगचा पहिला दिवस पोलंडमध्ये होता. त्यावेळी तापमान उणे २७ अंश होते. तळं गोठलं होतं आणि मला शिफॉन पटियाला सलवार सूट घालून शूट करावे लागले. तर आमिर खानने शूटिंगसाठी स्थानिक बाजारातून स्वत:साठी जाड जॅकेट आणले होते. त्यामुळे गाण्यात माझ्या चेहऱ्यावर कडाक्याच्या थंडीची खरी वेदना होती. 

Kajol's Memory Of Fanaa
Sudipto Sen In Hospital : केरळ स्टोरीचे दिग्दर्शक सुदिप्तो सेन रुग्णालयात...नेमकं काय झालंय?

काजोलने याच्या पुढे लिहिले- 'आश्चर्य तर तेव्हा वाटले होते जेव्हा आम्ही शूट संपवून मुंबईला परतलो तेव्हा आम्हाला कळले की गाणे पुन्हा शूट केले जाईल. 

ज्या महिला फक्त सुंदर दिसण्यासाठी हे करू शकतात त्या महिलांना तुम्ही सलाम करू शकता का? फनाला 17 वर्षे. तुम्हाला सांगतो, या चित्रपटाने त्यावेळी 100 कोटींहून अधिक कमाई केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com