कंगनाने ''या'' दिग्दर्शकाला चक्क देवता म्हटलं; जाणून घ्या

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 9 मार्च 2021

कंगना रणावतने थलायवी चित्रपटाचे दिग्दर्शक विजय यांच्यासाठी ट्विटरवरुन एक पोस्ट लिहिली आहे.

मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेत्री कंगना रनावत तिच्या वक्तव्यामुळे सतत चर्चेत असते. कंगना सध्य़ा तामिळनाडूच्य़ा माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर आधारित 'थलायवी' बायोपिकमध्ये काम करत आहे. थलायवी चित्रपटाचे चित्रीकरण आता पूर्णत्वाकडे आले आहे. कंगना रणावतने थलायवी चित्रपटाचे दिग्दर्शक विजय यांच्यासाठी ट्विटरवरुन एक पोस्ट लिहिली आहे.

ट्विटरवरुन कंगनाने चित्रपटाच्या शूटिंगच्या सेटवरचे फोटो शेअर केले आहेत. आणि यात थलायवी चित्रपटाचे दिग्दर्शक विजय़ यांनी देवता म्हटले आहे.‘’विजय सर थलायवीचं अर्ध डबींग पूर्ण झालं आहे. आणि आता अर्ध डबींग तेवढ बाकी आहे. आता हा प्रवास संपत आला आहे. माझ्या मनात यापूर्वी अशी भावना कधीच नव्हती जशी आज आहे. मी तुम्हाला आत्तापासून मिस करत आहे. असं मला लक्षात येत आहे,’’ अशी पोस्ट तिने केली आहे.

प्रसिध्द दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी गंगूबाई काठियावाडी चित्रपटाचं शूट...

कंगना पुढे म्हणते, ‘’मला तुमच्याबद्दल एक गोष्ट प्रकर्षाने माहीत झाली की, तुम्ही चहा, कॉफी, वाईन, नॉनव्हेज, आणि पार्टीज यापासून दूर आहात. आता मला हळूहळू समजत आहे की, मी जस जशी कलाकार म्हणून जास्त प्रकट होऊ लागते, तेव्हा तुमच्या डोळ्यांमध्ये एक वेगळ्याच प्रकारचे तेज असते. मी तुम्हाला कधीही रागवलेले, अस्वस्थ झालेलं कधीच पाहिलेलं नाही. तुम्हाला ओळखणारे लोक ज्यावेळी तुमच्याबद्दल बोलतात तेव्हा त्यांच्याही डोळ्यांमध्ये एक वेगळच तेज दिसून येतं. तुम्ही माणूस नाही तर देवता आहात. मला खरचं मनापासून आभार मानायचे आहेत. मला तुमची सतत आठवण येत राहील. तुमचीच, कंगना.’’

 

 

संबंधित बातम्या