पश्चिम बंगालच्या निकालानंतर कंगना रानौत बरळली; नेटीजन्स करतायेत ट्रोल

दैनिक गोमंतक
रविवार, 2 मे 2021

देशातील चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज लागणार आहे. अशातच देशातील सर्वांचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकांचे निकाल देखील हळूहळू हाती येऊ लागले आहेत.

पश्चिम बंगाल : देशातील चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज लागणार आहे. अशातच देशातील सर्वांचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकांचे निकाल देखील हळूहळू हाती येऊ लागले आहेत. सकाळपासून पिछाडीवर असलेल्या बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आता आघाडीवर आल्या आहेत. विरोधी पक्षाचे प्रतिस्पर्धी शुभेन्दू अधिकारी यांच्या मागे टाकत ममता बॅनर्जी यांचा तृणमूल कॉंग्रेस पक्ष आता आघाडीवर आला आहे. ही पाहता अभिनेत्री कंगना रानौत चांगलीच भडकळी आहे. गेल्या काही दिवसांपासून आपल्या टट्विटमुळे चर्चेत असलेल्या कंगनाने पुन्हा एकदा ट्विट करत ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला आहे. ''ममता बॅनर्जी बांगलादेशी आणि रोहिंग्या मुस्लिमांमुळे जिंकल्या असल्याचं कंगनाने म्हटलं आहे. (Kangana Ranaut angry after West Bengal result; Netizens do trolls) 

‘मी न्यूड सीन देणार पण...’

बांगलादेशी आणि रोहिंग्या ही ममता बॅनर्जी यांची सर्वात मोठी ताकद आहेत. ट्रेंड पाहता असे दिसत आहे की त्याठिकाणी आता हिंदू राहिले नाहीत. आकडेवारीनुसार बंगाली मुस्लिम हे भारतातील सर्वात गरीब व वंचित आहेत, चांगली गोष्ट अशी आहे की, देशात आणखी एक काश्मीर होत आहे.'' असे वादग्रस्त ट्विट करत कंगनाने पुन्हा  एकदा वाद इदहवून घेतल्याचे दिसत आहे. तथापि, कंगणाच्या या ट्विटवर अनेक प्रतिकीया आल्या आहेत. कंगनाच्या या वादग्रस्त ट्विटवर सोशल मीडियावर लोकांनी  तिची चांगलीच खिल्ली उडवली आहे. एका ट्विटर युजरने, तूला त्रास होत असेल तर जा आणि बर्फाच्या लादीवर जाऊन झोप.' असे तिला म्हटले आहे. 

तर दुसऱ्या एक युजरने देखील तिला चांगलाच टोला लगावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना,  दीदी ओ दीदीं' असे  इतक्या तिरस्काराने म्हटले होते.  मग दीदींनीही ठरवले होते, की आता पुन्हा माझेच सरकार स्थापन होईल आणि बंगालमधील जनतेनेही हेच ठरवले की आता बंगालमध्ये मोदी सरकार येऊ द्यायचे नाही. असे म्हणत कंगणाची खिल्ली उडवली आहे. तर तिसऱ्या युजरनेदेखील तिच्यावर चांगलीच टीका केली आहे. आपल्या मालकाचा अपमान झालेला सहन झालं नाही इतकी तुला मिरची झोंबली का? असे म्हणत तिच्यावर निशाणा साधला आहे. 

 
दरम्यान, कंगणाच्या  फ्रंट वर्कबद्दल बोलायचे झाल्यास तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिताच्या यांच्या भूमिकेत ‘थलाईवी’ चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय कंगना तिच्या 'धाकड' आणि 'तेजस' सिनेमांमध्येही काम करत आहे.
 

 

संबंधित बातम्या