
बॉलिवूडमधील सर्वात वादग्रस्त अभिनेत्री म्हणून कंगना रणौत सोशल मिडीयावर नेहमीच चर्चेत असते. कंगना तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे अनेकदा अडचणीत देखिल आली आहे. तिच्यावर गुन्हेही दाखल झाले आहेत. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक या विषयांवर तिने केलेल्या वक्तव्यांची दखल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात घेतली जाते. त्यावरुन तिच्यावर टीकाही झाली आहे. परंतु या सगळ्यांचा फरक कंगनाला पडत नाही. सध्या कंगना तिच्या एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे. (Kangana Ranaut On Emergency News)
कंगनाने तिच्या आगामी एका चित्रपटातील प्रसंग सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. त्याची चर्चा सोशल मिडीयावर सुरु झाली आहे. 25 जुन 1975 मध्ये आणीबाणीची घोषणा करण्यात आली होती. देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांच्या आयुष्यावर आधारित एका चित्रपटाची (Movie) निर्मिती करत आहे. याचा निर्माता आणि दिग्दर्शन कंगना करत आहे. त्याविषयी कंगनानं माहिती देत सांगितले की ती 'इमर्जन्सी' चित्रपटामध्ये इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे. तिने 1975 मधल्या एका वृत्तपत्राचा फोटो सोशल मीडियावर शेयर केले आहे.
कंगनाने सोशल मीडियावर पोस्ट शेयर करत लिहीले की, जगातील सर्वात नाटकीय घटना या दिवशी घडली होती. आजच्या दिवशी त्या निर्णयाची नोंद घेतली होती. त्या सगळ्याचे परिणाम काय झाले होते, हे काही वेगळे सांगण्याची गरज नाही. जगामध्ये सर्वात प्रभावशाली महिला होती. या चित्रपटाच्या माध्यमातून त्या महान व्यक्तिमत्वाच्या आठवणींना उजाळा देण्यात येणार आहे. पुढच्या वर्षी आणीबाणी काय होती हे आपल्याला समजून घेता येणार आहे. दिवंगत प्रधानमंत्री इंदिरा गांधींची भूमिका कंगना करणार आहे.
कंगना इंदिरा गांधी यांच्या आयुष्यावर आधारित 'इमर्जन्सी' (Emergency) नावाच्या चित्रपटामध्ये मुख्य भुमिका साकारणार आहे. त्याचबरोबर ती तिच्या मणिकर्णिका रिटर्न्स, 'सीता द अवतार' च्या चित्रिकरणाला सुरुवात करणार आहे. काही दिवसांपूर्वी कंगनाचा 'धाकड' नावाचा चित्रपट रिलीज झाला होता. ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला नाही.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.