काशीतील प्रत्येक भागामध्ये 'शिवाचे' वास्तव्य: कंगना रणौत

देशात सध्या सुरू असलेल्या ज्ञानवापी मशीद वादाच्या पार्श्वभूमीवर कंगना रणौत वाराणसीत पोहोचली आहे.
Kangana Ranaut
Kangana RanautDainik Gomantak

देशात सध्या सुरू असलेल्या ज्ञानवापी मशीद (Gyanvapi Masjid Case) वादाच्या पार्श्वभूमीवर कंगना रणौत (Kangana Ranaut) वाराणसीत पोहोचली आहे. सध्या कंगना तिच्या आगामी 'धाकड' या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. या संदर्भात, ती 'धाकड'च्या टीम आणि कलाकारांसह वाराणसीच्या काशी विश्वनाथ मंदिरात पोहोचली जिथे तिने दर्शन घेतले आणि प्रार्थना देखील केली. (Kangana Ranaut has reached Varanasi on the backdrop of Gyanvapi Masjid controversy)

Kangana Ranaut
Oscar Awards: ऑस्करमध्ये अवघ्या एका मताने हुकले 'मदर इंडिया'चे विजेतेपद

यादरम्यान, जेव्हा मीडियाने कंगनाला ज्ञानवापी मशिदीत सापडलेल्या शिवलिंगाच्या दाव्यावर प्रश्न विचारला तेव्हा अभिनेत्रीने खुलेपणाने माध्यमांना उत्तर दिले. आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाणारी कंगना म्हणाली की, 'काशीच्या प्रत्येक कणात महादेव वसला आहे'.

पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना कंगना म्हणाली की, 'जसे मथुरेच्या प्रत्येक कणात भगवान कृष्ण आहे, अयोध्येच्या प्रत्येक कणात राम आहे, त्याचप्रमाणे काशीच्या प्रत्येक कणात महादेव देखील आहे. त्यांना कोणत्याही संरचनेची आवश्यकता नाहीये. यानंतर कंगनाने हर हर महादेवचा नारा दिला, आणि आता अभिनेत्रीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

आजकाल कंगना रणौत वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तिच्या चित्रपटाचे प्रमोशन करते आहे. काही दिवसांपूर्वी ही अभिनेत्री कपिल शर्माच्या 'द कपिल शर्मा' शोमध्ये (The Kapil Sharma Show) पोहोचली होती.

Kangana Ranaut
शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा अडचणीत, मनी लाँड्रिंग प्रकरणात ED ने नोंदवला FIR

त्याचवेळी अभिनेत्री वाराणसीला पोहोचली. कंगनाने तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत ज्यात ती काशी विश्वनाथ मंदिरात आरती करताना दिसून आली आहे. यावेळी तिच्यासोबत तिचे सहकलाकार अर्जुन रामपाल आणि दिव्या दत्ता देखील उपस्थित होते. या चित्रपटात कंगनाने जबरदस्त अॅक्शन सीन्स केले आहेत ज्याची चाहत्यांमध्ये खूप चर्चा होत आहे. हा चित्रपट उद्या म्हणजेच 20 मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होईल.

वाराणसीमध्ये ज्ञानवापी मशीद प्रकरणी आज वाराणसी न्यायालयात सुनावणी होणार आहे. सोबतच या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरही निर्णय देण्यात येणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com