Kangana Ranaut on Khalistani Movement :"पंजाबमधली दहशत पाहुन लाज वाटते ?" कंगना रणौतने कुणाला केला हा सवाल?

अभिनेत्री कंगना रणौतने ट्विट करत आपला राग व्यक्त केला आहे
Kangana Ranaut
Kangana RanautDainik Gomantak

Kangana Ranaut on Khalistani Movement : कंगना रणौत हे नाव नेहमीच माध्यमांमध्ये चर्चेत असतं. कुठल्याही गोष्टीवर बिनधास्त मत मांडणारी अभिनेत्री म्हणुन कंगनाचंच नाव समोर येतं. आता कंगनाने पंजाबमधल्या खलिस्तानी चळवळीवर भाष्य केलं आहे.

आठवडाभरापूर्वी अमृतसरमधील अजनाळा पोलिस स्टेशनमध्ये मोठा गोंधळ झाला होता. 'वारीस पंजाब डे' या खलिस्तान समर्थक संघटनेचे प्रमुख अमृतपाल सिंग यांनी गोंधळ घातला. यावर कंगना राणौतने चक्क ट्विट करत आपला राग काढला. यासोबतच अमृतपाल यांच्याशी थेट चर्चा करण्याची अटही घातली होती.

आता कंगनाने पुन्हा एकदा ट्विट करत 'खलिस्तानी'वर घणाघाती फेसबुक पोस्ट टाकली आहे. यामध्ये त्यांनी तीन वर्षे जुनी घटनेची आठवण सांगितली आहे, ज्या काळात तिला त्रास सहन करावा लागला होता.

कंगना रणौतने फेसबुकवर लिहिले- 'जेव्हा मी तीन वर्षांपूर्वी खलिस्तानी लोकांबद्दल बोललो होतो, तेव्हा माझ्या सर्व ब्रँडने मला काढून टाकले, लाखो लोकांनी मला अनफॉलो केले, डिझायनर्सनी माझ्या फोटोंसह त्यांच्या पोस्ट काढून टाकल्या आणि पूर्णपणे बंदी घातली. आज पंजाबची दहशत पाहून त्यांना लाज वाटते का?

कंगना रणौत पुढे म्हणाली, 'मी चूक केली असे त्यांना वाटते का? की रक्त प्यायची तहान होती, कोणी प्यायले, का प्यायले, हे विचारायचं नाही का...? थोडी जरी माणुसकी असेल तर नक्कीच लाज वाटेल पण दानव असतील तर धर्म नष्ट करणे एवढेच त्यांचे काम आहे. आणि अधर्म विजयी आहे, मग कोणतीही लाज वाटणार नाही... विचार करा आणि स्वतःला विचारा.'

Kangana Ranaut
Sunny Deol : सनी देओललाच जेव्हा एकजण म्हणतो "तुम्ही सनी सारखे दिसता"! मजेदार व्हिडीओ व्हायरल

कंगना रणौत सोशल मीडियावर सक्रिय असते. मुद्दा कोणताही असो, त्यांची प्रतिक्रिया नक्कीच येते. त्यांनी यापूर्वी केलेल्या ट्विटमध्ये तीन वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेवर लिहिले होते – 6 समन्स, एक अटक वॉरंट, पंजाबमध्ये माझ्या चित्रपटांवर बंदी, माझ्या कारवर हल्ला. 

देशाची एकता टिकवण्यासाठी राष्ट्रवादी व्यक्तीला ही किंमत मोजावी लागते. भारत सरकारने खलिस्तानींना दहशतवादी घोषित केले आहे. तुमचा राज्यघटनेवर विश्वास असेल तर त्यात शंका नसावी.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com