कंगनाने ठोकला ट्विटरला रामराम QooApp वर करणार आता कावकाव

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 11 फेब्रुवारी 2021

कंगना रनौतने शेवटी ट्विटर सोडण्याचा निर्णय घेतला  आहे.  ती लवकरच आपलं ट्विटरवरील अकाउंट डिलीट करणार आहे ट्विटरला ती आता कायमचा रामराम करत असल्याची माहिती स्वत: कंगनाने ट्विट करून दिली आहे.

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत तिच्या ट्विटमुळे बरीच चर्चेत आहे. ती नेहमीच सोशल मिडियावर अक्टीव्ह असते. कंगना रनौतच्या बहुतेक ट्वीट्समुळे तीला बऱ्याचदा टिकेचा मासना करावा लागला. त्याचबरोबर आता ट्विटरने कंगना रनौतवर कारवाई देखील केली आहे. गेल्या काही दिवसांपासून तीने सतत देशात घडत असलेल्या घटनांवर ट्विट केले आहे. त्यामध्ये शेतकरी आंदोलन असो किंवा संजय राऊतांना दिलेलं प्रतिउत्तर असो. या सर्व प्रकारामुळे त्रस्त झालेल्या कंगना रनौतने शेवटी ट्विटर सोडण्याचा निर्णय घेतला  आहे.  ती लवकरच आपलं ट्विटरवरील अकाउंट डिलीट करणार आहे ट्विटरला ती आता कायमचा रामराम करत असल्याची माहिती स्वत: कंगनाने ट्विट करून दिली आहे.

तेलंगणाच्या मनसा वाराणसीने पटकावला फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2020 चा खिताब -

 "ट्विटर आता तुझा टाईम संपला आहे. आता Koo App वर शिफ्ट होण्याची वेळ आली आहे. मी लवकर कू अॅपवर शिफ्ट होत आहे. या संदर्भातील माझ्या अकाऊंटची डिटेल शेअर करेल. आता स्वदेशी कू अॅपचा अनुभव घेण्यासाठी मी उत्सुक आहे." असे ट्विट कंगनाने केले आहे.

ट्विटरने सरकारचा आदेश मान्य न केल्यास,अधिकाऱ्यांना अटकदेखील होऊ शकते -

कंगनाचे 30 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स ट्विटरवर आहे. कंगनाच्या या   ट्विटर सोडण्याच्या निर्णयामुळे तीच्या फॉलोअर्सची निराशा होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ पॉप स्टार रिहानाने ट्वीट केले होते. रिहानाच्या या ट्वीटवरून कंगनाने शेतकरी आंदोलनावर निशाणा साधला होता. ट्विटरने यासंदर्भात आक्षेप घेत कंगनाचे ट्विट डिलिट केले आहेत. त्याचबरोबर तीच्या वादग्रस्त  आणइ भडकावू ट्वीटमुळे कंगनासोबत असलेल्या 6 बड्या ब्रँड्सकडूनचे करार रद्द करण्यात आले होते.

संबंधित बातम्या