Ripped Jeans: कंगनाने घेतली रिपड जीन्स प्रकरणात उडी; सोबतच दिला फॅशन सल्ला

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 20 मार्च 2021

बॉलिवूड ही देशातील एक फॅशन इंडस्ट्री मानली जाते. कारण प्रत्येक नवीन फॅशन शैलीची सुरुवात बॉलिवूड मधूनच होतं. अशा वेळी जेव्हा त्याच फॅशनवर प्रश्न उपस्थित केले जात आहे तेव्हा वक्तव्यावर आता कंगनाने देखिल प्रतिउत्तर दिलं आहे.

मुंबई: बॉलिवूड ही देशातील एक फॅशन इंडस्ट्री मानली जाते. कारण प्रत्येक नवीन फॅशन शैलीची सुरुवात बॉलिवूड मधूनच होतं. अशा वेळी जेव्हा त्याच फॅशनवर प्रश्न उपस्थित केले जात आहे. उत्तराखंडच्या नव्या मुख्यमंत्र्यांनी फाटलेल्या जीन्सवर (रिपड जीन्स) विधान केले आहे, या वक्तव्यावर आता कंगनाने देखिल प्रतिउत्तर दिलं आहे. मात्र कंगनाने जे म्हटलं त्यावरून हे स्पष्ट झालं आहे की, ती तीरथसिंग रावत यांच्या विरोधात नाही . परंतु तिने स्वत: मुद्दा मांडला आहे, आपलं वयक्तीक मत व्यक्त केलं आहे. तीने ट्विटरवर फोटो शेअर करत प्रतिक्रिया व्यक्त केलं आहे.

काय म्हटले आहे कंगना रनौत

ट्विटमध्ये कंगनाने रिप्ड जीन्सला पाठिंबा दर्शविला पण आपली स्टाइल कॅरी करण्याचा सल्लाही तीने दिला. कंगनाने आपले फोटो शेअर केले आहेत ज्यात असे म्हटले आहे की, "फाटलेली जीन्स या चित्रांमध्ये दिसणाऱ्या मुलीप्रमाणेच असली पाहिजेत. आपली स्टाइल दाखवा. आई-वडिलांकडून पॉकेट मनी न मिळाल्याने आपण अशी  फाटलेली जिन्स घालतो आहे असे बेघर माणसासारखे दिसू नका."

फाटलेल्या जीन्सबाबत उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी निवेदन दिले

अलीकडेच तीरथसिंग रावत उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री झाले आहेत आणि त्यांचे वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. चीरलेली जीन्स समाज तोडण्याचे काम करत आहेत. यावर प्रथम अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली यांनी विरोध दर्शविला. फाटलेल्या जीन्समध्ये हे चित्र सामायिक करून मुख्यमंत्र्यांच्या विधानावर नव्याने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. मी गर्वाने फाटलेली जिन्स घालणार असे ट्विट तिने केले होते.

आज गुल पनागनेही फाटलेल्या जीन्समध्ये एक फोटो शेअर केला आहे. याशिवाय सोना महापात्रानेही या निवेदनावर निषेध नोंदविला आहे. त्याचबरोबर राजकीय क्षेत्रातील महिलांनीही त्यांच्या या व्यक्तव्याचा जाहीर निषेध केला आहे.

संबंधित बातम्या