"मी मेले तरी तुमच्या सारख्या लांडग्यांना सोडणार नाही"

गोमंन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 21 जानेवारी 2021

मी जरी मेले तरी माझ्या राखेतून 'मी तुमच्या सारख्या लांडग्यांना सोडणार नाही.' असा आवाज आल्याशिवाय राहणार नाही," असे कंगणाने म्हटले आहे.

मुंबई: कोणी काही बोलले तरी कंगणा कुणाचेही ऐकणार नाही हे आतापर्यतच्या तिच्या वर्तणावरून दिसून आले आहे. नेहमीच वादग्रस्त वक्तव्यं करुन सर्वांचे लक्ष वेधून घेणा-या कंगणाला न्यायालयानंही फटकारले आहे. तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरही बंदी घालण्यात आली आहे. याचे कारण म्हणजे ताळतंत्र सोडून बडबड करणे. गेल्या काही दिवसांपासून तिचे बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटीशी वाद झाले आहे. त्यात सुप्रसिध्द गीतकार जावेद अख्तर यांच्यासोबतचा वाद चांगलाच पेटलेला आहे. 

कंगणाच्या विरोधात जावेद अख्तर यांनी न्यायालयात मानहानीची तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर कंगणाला पोलिसांनी समन्स बजावला आहे. तसेच तिला चौकशीसाठी पोलीस स्टेशममध्ये उपस्थित राहण्यासही सांगितले आहे. या सगळ्या प्रकरणावर टीका करतांना तीने सोशल मीडियावरून जावेद अख्तर यांच्यावर टीका केली आहे.

"आज माझ्यावर वेळ आहे. मला आणखी एक समन्स देण्यात आला आहे. अशावेळी सगळे लांडगे एकत्र आले आहे. त्यांचा मला तुरूंगात टाकण्याचा त्यामागील उद्देश मला माहित आहे. पण मी कुणालाच सोडणार नाही. अशावेळी मला त्रास देऊन माझ्यावर 500 पेक्षा अधिक केसेस दाखल केल्या आहेत. हे असे करून तूम्हाला नेमकं काय साध्य करायचं आहे. मी जरी मेले तरी माझ्या राखेतून 'मी तुमच्या सारख्या लांडग्यांना सोडणार नाही.' असा आवाज आल्याशिवाय राहणार नाही," असे कंगणाने म्हटले आहे.

मुंबई पोलिसांनी शुक्रवारी कंगणाला जुहू पोलीस ठाण्यात बोलावले आहे. गीतकार जावेद अख्तर यांनी मागच्या वर्षीच्या नोव्हेंबर मध्ये कंगणाच्या विरोधात मानहानीची तक्रार दाखल केली होती. कंगणाने त्यांच्यावर अपमानास्पद टिप्पणी केली होती. असे जावेद अख्तर यांनी म्हटले होते. “सुशांतसिंगच्या मृत्युनंतर कंगणाने माझ्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. कंगणानं जे काही आरोप केले आहेत ते चूकीचे आहेत. त्यामुळे माझी मानहानी झाली आहे,” असे अख्तर यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे.

'तांडव' नंतर आता 'मिर्जापूर' वेब सिरीज वादाच्या भोवऱ्यात    

दरम्यान कंगणाने ऋतिक रोशन प्रकरणात प्रतिक्रिया देणा-या जावेद अख्तर यांना शांत राहण्यास सांगितले होते. कंगणाने बॉलीवूडमधल्या काही कलाकारांना मुव्ही माफिया असे देखील म्हटले होते. याशिवाय अनुराग कश्यप, स्वरा भास्कर, तापसी पन्नु, जावेद अख्तर, दिलजीत दोसांज यासारख्या सेलिब्रिटींवरही कंगणानं आपली तोफ चालवली होती. त्यामुळे कगणा वादाच्या चक्रात सापडली आहे.

संबंधित बातम्या