जावेद अख्तर यांची मानहानी केल्याप्रकरणी कंगना रनौतला समन्स

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 1 मार्च 2021

लेखक व गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्याच्या सुनावणीला उपस्थित न राहील्याबद्दल मुंबई कोर्टाने कंगना रनौतला समन्स बजावले आहेत.

मुंबई : लेखक व गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्याच्या सुनावणीला उपस्थित न राहील्याबद्दल मुंबई कोर्टाने कंगना रनौतला समन्स बजावले आहेत. कंगना कोर्टात हजर न झाल्याने हे समन्स बजावण्यात आले आहेत. यासंदर्भात कंगनानेही ट्विट केले असून यावरून तिला हे समन्स मिळाल्याचं दिसून येत आहे. कंगनाने तिच्या ट्विटमध्ये लिहिले आहे - 'गिधडांचा एक कळप आणि त्यांच्याशी लढणारी एक सिंहीण, मजा आली.'

Golden Globes 2021:चॅडविक बॉसमनला मरणोत्तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार

गीतकार जावेद अख्तरच्या तक्रारीवरून मुंबईच्या कोर्टाने अभिनेत्री कंगना रनौतला समन्स बजावले आहेत. जावेद अख्तरने कंगनाविरोधात बदनामी केल्याची तक्रार दाखल केली आहे. डिसेंबर 2020 मध्ये अंधेरी मेट्रोपॉलिटन दंडाधिकारी यांनी जुहू पोलिसांना जावेद अख्तर यांनी कंगना रनौतविरोधात गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये न्यायालयासमोर दाखल केलेल्या मानहानीच्या तक्रारीचा तपास करण्याचे निर्देश दिले होते. कोर्टाने या प्रकरणातील सुनावणीची पुढील तारीख 1 मार्च निश्चित केली होती. 

बीग बी अमिताभ बच्चन यांची प्रकृती खालावली; शस्त्रक्रियेची शक्यता

अख्तर यांचे वकील जय कुमार भारद्वाज यांनी आज कोर्टाला सांगितले की पोलिसांनी गेल्या महिन्यात रानौत यांना समन्स बजावले होते व त्यांचे निवेदन नोंदवण्यासाठी पोलिसांसमोर हजर रहावे असे सांगितले होते. परंतु या संदर्भात कंगनाने अद्याप कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. गेल्या वर्षी जून महिन्यात अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या निधनानंतर एका मुलाखतीत कंगनाने आपल्याबद्दल अपमानास्पद टिप्पण्या केल्या असल्याचा आरोप जावेद अख्तर यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. कंगना रनौत हिने यांनी केलेल्या निराधार टिप्पण्यांमुळे त्यांची प्रतिष्ठा दुखावल्याचा दावा जावेद अख्तर यांनी केला आहे. 

संबंधित बातम्या