अकाउंट सस्पेंड केल्यावर कंगना "ट्विटरवर" भडकली

दैनिक गोमंतक
मंगळवार, 4 मे 2021

कंगना रनौतचे ट्विटर अकाउंट सस्पेंड केल्यानंतर ट्विटर वर तिच्या विरोधात जोरदार शेरेबाजी केली जात असल्याचे पाहायला मिळते आहे.

अभिनेत्री कंगना रनौत ही नेहमीच तिच्या वादग्रस्त ट्विट साठी चर्चेत असते. कंगना रनौत आपल्या ट्विटर अकाऊंटवरून भारतीय जनता पक्षाच्या भूमिकेचे समर्थन करताना आक्रमक भूमिका मांडत असते. तिच्या अनेक ट्विट मधून सामाजिक, धार्मिक भावना दुखावल्याचे दिसून आले आहे. याच अनुशंघाने ट्विटरने कंगना रनौतचे ट्विटर अकाउंट काही काळासाठी सस्पेंड केले आहे. त्यानंतर कंगना रनौतने 'ट्विटर'च्या या निर्णयावर टीका केली आहे. (Kangana Ranaut's reaction after her Twitter account was suspended)

ट्विटरने (Twitter) कंगना रनौतचे  (Kangna Ranaut) अकाउंट सस्पेंड (Suspended) केल्यानंतर तिने ट्विटरवर वर्णद्वेषी असल्याचा आरोप केला आहे. "आपलं ट्विटर अकाउंट रद्द करून ट्विटरने हे सिद्ध केलं आहे की ते अमेरिकी आहेत. कृष्णवर्णीय लोकांना आपला गुलाम बनवावे असे अमेरिकेला वाटते आहे. आपण काय बोलावे, काय विचार करावा हे सुद्धा तेच थरबनार आहेत. मात्र आपल्याकडे व्यक्त होण्यासाठी चित्रपटासोबतच अनेक प्लॅटफॉर्म आहेत" अशी भूमिका कंगना रनौतने मांडली आहे. 

सलमानच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी...

कंगना रनौतचे ट्विटर अकाउंट सस्पेंड केल्यानंतर ट्विटर वर तिच्या विरोधात जोरदार शेरेबाजी केली जात असल्याचे पाहायला मिळते आहे. अनेकांनी ट्विटरच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. मात्र अकाउंट रद्द केल्यानंतर कंगना रनौतने मांडलेल्या भूमिकेनंतर यापुढे देखील ती शांत राहणार नसल्याचे समजते आहे. 

दरम्यान पश्चिम बंगाल निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या अपयशानंतर कंगना रनौतने आपल्या ट्विटर अकाउंट वरून भडकाऊ पद्धतीने आपली मते मंडळी होती. तिने केलेल्या या ट्विटमधील अनेक ट्विट सामाजिक भावना दुखावणारे होते. त्यानंतर ट्विटरने वारंवार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंगना रनौतचे ट्विटर अकाउंट रद्द केले आहे.     

संबंधित बातम्या