कंगनाला बजावली कायदेशीर नोटीस; बिलकिस बानो प्रकरणी माफी न मागितल्यास...

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 2 डिसेंबर 2020

देशात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात शाहीनबाग आंदोलनात सहभाग नोंदवणाऱ्या बिलकीस बानो याही हजर होत्या. शाहीनबाग आंदोलना दरम्यान 'दादी' नावाने त्या अतिशय प्रसिद्ध झाल्या  होत्या. कंगनाने या दादींबद्दलच आक्षेपार्ह विधान केले होते. 

कंगना आणि वाद हे आता एक नवीनच समीकरण झाले आहे. यात त्यांना साथ देणारा त्यांचा मोलाचा सहकारी आहे ट्विटर. देशात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात शाहीनबाग आंदोलनात सहभाग नोंदवणाऱ्या बिलकीस बानो याही हजर होत्या. शाहीनबाग आंदोलना दरम्यान 'दादी' नावाने त्या अतिशय प्रसिद्ध झाल्या  होत्या. कंगनाने या दादींबद्दलच आक्षेपार्ह विधान केले होते. 

कंगनाने या ‘दादी’वर एक ट्विट केले होते. ज्यात तिने म्हटले होते की, शाहीनबाग आंदोलनात सहभागी झालेल्या बिलकीस बानो या १०० रूपये घेऊन कोणत्याही आंदोलनात सहभागी होतात. हे ट्विट करताने तिने एका वृद्ध महिलेचा फोटोही शेअर केला होता. त्यानंतर  लोकांनी तिला ही फेक बातमी असल्याचे सांगितले. लोकांनी यावेळी तिला दादीची माफी मागण्यासही सांगितले होते. त्यानंतर कंगनाने हे ट्विट डिलीट केले होते. मात्र, तिच्या डिलीट करण्याच्या आधीच हे ट्विट व्हायरल झाले होते. आता याच मुद्यावर कंगनाला कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे.   

दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार, पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या वरिष्ठ वकीलाने कंगनाला ही नोटीस पाठविली आहे. नोटीस पाठवणारे वकील एक सामाजिक कार्यकर्ता असून त्यांचे नाव हाकम सिंह असे आहे. त्यांनी त्या नोटीशीत म्हटलंय की, ‘आंदोलन करणे हा प्रत्येक नागरिकाचा संविधानिक अधिकार असून आपण यावर भाष्य करून फक्त संबंधित महिलेचाच नव्हे तर देशातील एकूण महिलांचा अपमान केला आहे. त्याबाबत तिने माफी मागावी.’

आता या नोटिशीनुसार कंगनाला पुढच्या सात दिवसांमध्ये माफी मागावी लागणार आहे. असे न केल्यास तिच्यावर मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात येईल. 

कंगनाने शेतकरी आंदोलनादरम्यान अनेकांबरोबर वाद घातले आहेत. यामुळे कंगनाला अनेकांनी तंबी देत आंदोलनाबाबत न बोलण्याच्या सुचना दिल्या आहेत. 

 

संबंधित बातम्या