कंगनाने दिपिकाला केलं ट्रोल; जाणून घ्या कारण

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 4 मार्च 2021

बॉलिवडूमधील प्रसिध्द अभिनेत्री कंगना रणावत तिच्य़ा वादग्रस्त विधानासाठी सतत चर्चेत असते.

मुंबई : बॉलिवडूमधील प्रसिध्द अभिनेत्री कंगना रणावत तिच्य़ा वादग्रस्त विधानासाठी सतत चर्चेत असते. कंगना समाजमाध्यमातून एकदम परखडपणे आपली मते मांडत असते. आताही कंगनाने बॉलिवूड अभिनेत्री दिपिका पदुकोणला टोला लगावला आहे.

कंगनाने एक ट्विटकरुन दिपिकावर निशाणा साधला आहे. तिने केलेल्या ट्विटमध्य़े ''तीन महिला दिसत आहेत. तिने हा फोटो 1857 चा असल्याचे सांगितले आहे. या फोटोमधील तिनही महिला त्यांच्या वेगवेगळ्या देशातील आहेत. तर त्यातील एक महिला डॉक्टर आहे. तसेच या फोटोमधील एक महिला भारतीय, दुसरी जपानी, तर तिसरी महिला सिरीयाची आहे. या तीनही महिलांनी आपला पांरपारिक पोशाख घातलेला आहे. या महिलांनी आपल्य़ा संपूर्ण संस्कृती, सभ्यता, आणि राष्ट्राचं उत्तम प्रतिनिधीत्व केलं आहे. मात्र आजच्या काळात अशा महिलांचे फोटो काढले तर त्या फाटलेल्या अमेरिकन जीन्स आणि चिंध्यासारखे ब्लाउज घालताना दिसतात. या महिला अमेरिकेसारख्या देशाचे मार्केटिंग करण्याशिवाय कोणतही काम करत नाहीत,'' अशा आशयाचे ट्विट कंगनाने केले आहे.

Video : बॉलिवूडच्या हिरो नंबर वनची लेकीने केली कॉपी

दिपीका सध्या 'Levis Jeans' या अमेरिकन जीन्स कंपनीची ब्रॅंड अम्बेसेडर बनली आहे. याच ब्रॅंडच्या जहिरातीसाठी दिपकाने इन्सस्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. आणि हा व्हिडीओ पाहताच कंगनाने दिपिकावर निशाणा साधला.  

 

संबंधित बातम्या