जयललिता नंतर इंदिरा गांधींची भूमिका साकारण्यासाठी कंगना रणौत सज्ज

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 30 जानेवारी 2021

कंगनाला एका राजकीय नाटक चित्रपटासाठी साइन केले गेले आहे ज्यात ती भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची भूमिका साकारणार आहे. मात्र, ही बातमी समोर आल्यानंतर कंगन रनौत सोशल मीडियावर ट्रोल होत आहे .

मुंबई: आपल्या चित्रपटांपेक्षा बर्‍याचदा चर्चेत राहिलेली कंगणा रनौत  कदाचित खऱ्या आयुष्यात कॉंग्रेस पक्षाला विरोध करत असतील, पण आता ती कॉंग्रेसच्या नेत्याच्या भमिकेत पडद्यावर दिसणार आहे. कंगनाला एका राजकीय नाटक चित्रपटासाठी साइन केले गेले आहे ज्यात ती भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची भूमिका साकारणार आहे. मात्र, ही बातमी समोर आल्यानंतर कंगन रनौत सोशल मीडियावर ट्रोल होत आहे .

कंगनाने दिलेल्या निवेदनानुसार, 'हो, आम्ही या प्रकल्पावर काम करत आहोत आणि चित्रपटाची स्क्रिप्ट अंतिम टप्प्यात आहे. हा इंदिरा गांधींचा बायोपिक नाही तर एक राजकीय नाटक आहे जो आपल्या पिढीला आजच्या भारताची सामाजिक-राजकीय परिस्थिती समजावण्यास मदत करणार आहे. कंगना या चित्रपटाला प्रोड्यूस करणार आहे. हा चित्रपट आपत्कालीन ऑपरेशन ब्लू स्टारवर आधारित असणार आहे. यात काही मोठे कलाकार काम करणार असल्याचे कंगनाने सांगितले आहे. ती म्हणाली की, "आपल्या भारतीय राजकारणातील सर्वात आइकॉनिक नेत्याची भूमिका साकारतांना मला खूप आनंद होत आहे." या चित्रपटाची कथा आणि पटकथा दिग्दर्शक साई कबीर यांनी लिहिली आहे, ज्यांनी यापूर्वी 'रिव्हॉल्व्हर राणी' चित्रपटात कंगनाच्या सोबत काम केले होते.

मात्र, ही बातमी समजताच लोक कंगना रनौत यांना ट्रोल करत आहेत. वास्तविक, जिवनात कंगना रनौत भाजपला पाठिंबा देतांना दिसते, अशा परिस्थितीत ती कॉंग्रेस नेत्याची भूमिका साकारणार हे ऐकून लोक तिची चेष्टा करत आहेत. कंगनाचा  पुढचा चित्रपट 'थलाइवी' रिलीज होणार आहे ज्यामध्ये ती जयललिताच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय ती 'तेजस'मध्ये भारतीय वायुसेनेची लढाऊ पायलट आणि 'धाकड'मध्ये एक सीक्रेट सर्विस एजेंट म्हणून दिसणार आहे. या व्यतिरिक्त तीने नुकताच मणिकर्णिकाचा सिक्वल 'मणिकर्णिका रिटर्न्स: द लीजेंड ऑफ दिड्डा' बनवण्याचीही घोषणा केली आहे.\

 

संबंधित बातम्या