कंगनाबाईंनी पाकिस्तानवर उधळली स्तुतीसुमने; ट्विट होतयं व्हायरल

गोमंतक वृत्तसेवा
रविवार, 25 एप्रिल 2021

या कठीण काळात आम्ही त्यांच्या सहानुभुतीचा आदर करतो.

बॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेत्री कंगना रणावत (Kangana Ranaut) बिनधास्तपणे सोशल मिडियावर मत मांडताना दिसते. कंगना तिच्या सततच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असते. आता कंगनाने ट्विटवर ट्रेंड होणारं हॅशटॅग #PakistanStandsWithIndia वर तिची प्रतिक्रिया देत ट्विट केलं आहे. कंगनाचं हे ट्विट सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (Kanganabai pours praise on Pakistan The tweet is going viral)

देशात (India) आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी (Corona Second Wave) सामना करण्यासाठी शेजारचा देश पाकिस्तान (Pakistan) आपल्याला मदत करण्यासाठी पुढे येत आहे. पाकिस्तानमध्ये ट्विटरवर ट्रेंड होणारं हॅशटॅग #PakistanStandsWithIndia वर कंगनाने आपली प्रतिक्रिया दिली आहे. ''पाकिस्तानच्या ट्विटरवर टॉप ट्रेंड होणार हॅशटॅग #PakistanStandwsWithIndia पाहून मला खूप आनंद झाला आहे. भारताचे वीर पुरुष पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) दिलेल्या लसीचे त्यांनी कौतुक केले, या कठीण काळात आम्ही त्यांच्या सहानुभुतीचा आदर करतो,’’ अशा आशयाचे ट्विट, कंगनाने केले आहे. 

पुन्हा एकदा सोनू सूद आला मदतीला धावून!

दरम्यान, कंगना रणावत अनेक चित्रपटात दिसणार आहे. त्यातील एक तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता (Jayalitha) यांच्या जीवनावर आधारित ‘थलायवी’(Thalaivai) हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव लक्षात घेता लागू करण्यात आलेल्या निर्बंधामुळे चित्रपट प्रदर्शानाची तारिख पुढे ढकलण्यात आली आहे. विशेष म्हणजे ‘थलावयी’  हा चित्रपट तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. यानंतर कंगना ‘तेजस’ (Tejas) आणि ‘धाकड’  (Dhakad) या दोन चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

संबंधित बातम्या