यामी गौतमच्या फोटोवर खिल्ली उडवणाऱ्यांना कंगनाचं सडेतोड उत्तर

गोमंन्तक वृत्तसेवा
सोमवार, 7 जून 2021

'हिमाचली वधू सर्वात सुंदर आणि देवीसारखी दिसते'.

बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम (Yami Gautam) ने 4 जुन ला उरी या चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य धर (Aditya Dhar) याच्याशी  लग्न (married) केले आणि तिच्या चाहत्यांना आश्चर्यचकित केले. केवळ चाहतेच नाही तर त्यांनी चित्रपटसृष्टीतील प्रत्येकाला आश्चर्यचकित केले आहे, त्यांच्या लग्नाचे फोटो देखील सोशल मीडियावर (social media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. लग्नानंतर यामी गौतमने तिच्या हळदी, मेहंदी आणि चुडा सोहळ्याचे बरेच फोटो पोस्ट केले होते.

 हे सर्व फोटो पाहून विक्रांत मेस्सीने (Vikrant Messi) कमेंट केली "राधे माँसारखे निर्मळ आणि पवित्र दिसत आहे." विक्रांतची ही कमेंट वाचल्यानंतर कंगना रणावत (Kangana Ranavat) संतापली आणि त्याने विक्रांत मेस्सीला उत्तर दिले की, 'हा झुरळ कोठून आला आहे, माझे चप्पल आणा.' इतकेच नाही तर कंगनाने दुसर्‍या कमेंटमध्ये लिहिले की, 'हिमाचली वधू सर्वात सुंदर आणि देवीसारखी दिसते'.(Kanganas unequivocal answer to those who make fun of Yami Gautams photo) 

Video Viral: कियारा आडवाणीचा 'जलपरी' वाला अंदाज

तसे, कंगना रनौत सोडून अनेक सेलिब्रिटींनी यमीचे अभिनंदन केले आहे. आयुष्मान खुरानाने (Ayushman Khurana) ही यावर कमेंट केली आणि म्हणाला, 'एकदम जय माता दी सारखं वाटतं आहे .' त्याच वेळी, त्याने यामीला  विनोदपणे विचारले की, 'दोघे ज्वालाजीला गेले होते का?' या व्यतिरिक्त  अनेक सेलिब्रिटींनी कमेंटद्वारे या दोघांचे अभिनंदन देखील केले आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Yami Gautam (@yamigautam)

संबंधित बातम्या