"त्याने एकदा सिध्द करून दाखवावे की तो  खलिस्तानी नाही"

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 8 फेब्रुवारी 2021

देशात सध्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान सोशल मीडियावर अभिनेत्री कंगना रनौत आणि पंजाबी गायक दिलजित दोसांझ यांच्यात होत असलेले सोशल मिडियावरचे संबंध थांबण्याचे नाव घेत नाही.

नवी दिल्ली: देशात सध्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान सोशल मीडियावर अभिनेत्री कंगना रनौत आणि पंजाबी गायक दिलजित दोसांझ यांच्यात होत असलेले सोशल मिडियावरचे संबंध थांबण्याचे नाव घेत नाही. येत्या दिवसाचत दोघांमध्ये सोशल मिडियावर वाद-विवाद सुरू आहे. अभिनेत्री कंगना रनौतने नुकत्याच एका दिलेल्या मुलाखतीमध्ये  पुन्हा एकदा  दिलजितचा उल्लेख केला आहे.

अलीकडेच कंगना रनौतने एक मुलाखत दिली होती. त्यामध्ये ती म्हणाली की, "मी दिलजितला खुले आव्हान दिले होते की त्याने  फक्त एकदाच सिध्द करून दाखवावे की तो  खलिस्तानी नाही, परंतु त्याने तसे केले नाही. तरुणांची दिशाभूल करण्याचे काम केले जात आहे, त्यांना खलिस्तानबद्दल एक स्वप्न दाखविण्यात आले आहे. 'मी सतत सोशल मिडियावर ट्रोल असूनही धैर्य गमावले नाही. मी कधीही स्वत: साठी काही करण्याचा प्रयत्न केला नाही. मी जे काही करत आहे ते माझ्या देशासाठी करत आहे. मी जे काही बोलत आहे तेदेखील या देशासाठीच आहे. मला या देशाकडून खूप प्रोत्साहन आणि आदर मिळाला आहे आणि त्याचा मला आनंद आहे."

दरम्यान, कंगना रनौतने सोशल मीडियावर गायक दिलजीत दोसांझला खलिस्तानी म्हणून संबोधले होते. तीने ट्विट करत, 'देश केवळ भारतीयांचा आहे, खलिस्तानवाद्यांचा नाही. सांग तू खलिस्तानी नाही. या चळवळीत भाग घेतलेल्या खलिस्तानी लोकांचा मी निषेध करा असे बोलून दाखव. जर तू असे जाहीर केले तर, मी स्वत:हून दिलगिरी व्यक्त करीन आणि तूला खरा देशभक्त समजेल. पटकन बोल, मी वाट बघत आहे.

'कंगनाच्या ट्वीटवर दिलजितने प्रत्युत्तरात दिले आणि म्हणाला की, "मी भारताबरोबर आहे. जेव्हा जेव्हा कोणी चूकीचे काम करेल ते सरकार पाहून घईल हे त्यांचे काम आहे. मी किंवा तू हे ठरवू शकत नाही. हा देश फक्त तुझा नाही सर्वांचा आहे. आमचा पण आहे, तेव्हा जा तू बोर नको करूस."

विशेष म्हणजे यापूर्वी शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ परदेशी सेलिब्रिटींनी ट्विट केले होते. ज्यात अमेरिकन पॉप सिंगर रिहाना, माजी, पॉर्न स्टार मिया खलीफा आणि एक्टिव्ह ग्रेटा थुनबर्ग यांचा समावेश होता. रिहानाच्या ट्वीटनंतर दिलजितने त्यांचे खूप कौतुक केले आणि त्यांच्या सन्मानार्थ 'रिरी-रिहाना' हे गाणेही प्रसिद्ध केले. यानंतर दिलजीच्या या कृत्यावर कंगनाने राग व्यक्त केला.

Budget 2021: वाहन स्क्रॅपिंग धोरण अर्थव्यवस्थेबरोबरच पर्यावरणासाठीदेखील फायदेशीर -

संबंधित बातम्या