The Kapil Sharma Show: 'तारक मेहता'ने कपिल शर्माची उडवली होती खिल्ली, आता त्याच्याच शोमध्ये...

कपिल शर्माच्या या शो मध्ये पाहुणे म्हणून संजय झाला, मुमताज नसीम आणि पॉपुलर मेरठी यांच्या सोबत येणार आहेत, तारक मेहता का उल्टा चष्मा फेम शैलेश लोढा.
The Kapil Sharma Show: 'तारक मेहता'ने कपिल शर्माची उडवली होती खिल्ली, आता त्याच्याच शोमध्ये...
Shailesh LodhaDainik Gomantak

चॅनलने आगामी एपिसोडचा प्रोमो रिलीज केला आहे. कपिल शर्माच्या या शो मध्ये पाहुणे म्हणून संजय झाला, मुमताज नसीम आणि पॉपुलर मेरठी यांच्या सोबत येणार आहेत, तारक मेहता का उल्टा चष्मा फेम शैलेश लोढा. यावरून शैलेशला मात्र चांगलेच ट्रोल केले जात आहे. कारणही तसेच आहे, शैलेशने काही काळापूर्वी कपिल शर्मा (Kapil Sharma)शोवर निशाणा साधला होता. शैलेश लोढा यांनी या शोला नाव न घेता स्लट म्हटले होते. शिवाय ते पाहून मला लाज वाटते, असेही ते म्हणाले. शैलेश मंचावरून म्हणाला होता की, मी असा कार्यक्रम करणार नाही, असे वचन सुध्दा स्वतःला दिले होते.

Shailesh Lodha
Why I Killed Gandhi: खासदार अमोल कोल्हे नथुराम गोडसेच्या भूमिकेत, महाराष्ट्रात वादंग

जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

सोनी टीव्हीने शनिवार-रविवार स्पेशल एपिसोडचा प्रोमो रिलीज केला आहे. यात कपिल शर्माच्या शोमध्ये नामवंत कवी सहभागी होणार आहे. यामध्ये तारक मेहता (Tarak Mehata) का उल्टा चष्मा फेम शैलेश लोढा (Shailesh Lodha)यांचा सुध्दा समावेश आहे. चॅनलच्या इन्स्टा हँडलवर शैलेश लोढा यांना ट्रोल केले जात आहे. याचे कारण म्हणजे त्याने या शोबद्दल सर्वांसमोर खूप पूर्वी चांगले-वाईट सांगितले आहे. त्याचा तो व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com