करण जोहरने करून दिली धर्मा प्रॉडक्शनच्या 14 नव्या दिग्दर्शकांची ओळख

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 5 मार्च 2021

निर्माता करण जोहर यावर्षी अनेक प्रकल्पांमध्ये व्यस्त असणार आहे. यंदा त्याचे अनेक चित्रपट आणि वेब सिरीज रिलीज होणार आहेत. करणची कंपनी धर्मा प्रोडक्शन्सने एका व्हिडिओसह ही बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे. 

मुंबई :  निर्माता करण जोहर यावर्षी अनेक प्रकल्पांमध्ये व्यस्त असणार आहे. यंदा त्याचे अनेक चित्रपट आणि वेब सिरीज रिलीज होणार आहेत. करणची कंपनी धर्मा प्रोडक्शन्सने एका व्हिडिओसह ही बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे. यात करण आपल्या 14 नवीन चित्रपट दिग्दर्शकांची ओळख करुन देताना दिसत आहे. यात ते धर्मा प्रॉडक्शनची चार दशके पूर्ण झाल्याबद्दल आनंद व्यक्त करताना दिसत आहेत. वेगवेगळ्या शैलीतील अनेक चित्रपट बनवण्याच्या धर्मा प्रोडक्शनच्या योजना आहेत. या पोस्टच्या माध्यमातून करणने सांगितले की तो हे चित्रपट अनेक प्रकारांमध्ये तयार करणार आहे. यात नव्या प्रकारातील वेगवेगळ्या प्रकारच्या कथा दाखवल्या जात आहेत. त्यांची नवीन टीम थ्रिलर, रोमॅन्टीक, अॅक्शन, कॉमिक असे अनेक चित्रपट सादर करेल. या स्टोरीज डिजिटल ते चित्रपट या विविध प्लॅटफॉर्म्सवर ते प्रदर्शित केले जातील.

तापसी पन्नूच्या अडचणीत वाढ; 5 कोटींच्या रोखीची पावती जप्त

करण पुढे म्हणाला की, धर्मा प्रॉडक्शनचे 14 प्रतिभावान दिग्दर्शक त्याच्या आगामी प्रकल्पात काम करतील. चित्रपटाच्या कथा तयार होत आहेत. आशा आहे की लवकरच या चित्रपटांची घोषणा होऊ शकते. नव्या कल्पना आणि नवीन रचनांसह तो प्रेक्षकांच्या भेटीला येईल, असेही त्याने सांगितले. धर्मा प्रोडक्शनने शेअर केलेल्या फोटोमध्ये काळे कपडे परिधान केलेले 14 नवीन दिग्दर्शक दिसत आहेत. व्हिडिओमध्ये त्यांच्या नावाची ओळख करून दिली जात आहे. करणने अलीकडेच आपले पाच नवीन प्रकल्प जाहीर केले आहेत, जे नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होतील. यात 'अजीब दास्तान', 'मीनाक्षी सुंदरेश्वरार', 'फाइंडिंग अनामिका', 'सर्चिंग फॉर शीला' आणि 'फॅब्युलस लाइव्ह्स ऑफ बॉलिवूड वाईव्हस्' यांचा समावेश आहे.

कंगनाने दिपिकाला केलं ट्रोल; जाणून घ्या कारण

'फाइंडिंग अनामिका'मध्ये अभिनेत्री माधुरी दीक्षित मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सान्या मल्होत्रा ​​'मीनाक्षी सुंदरेश्वरार' मध्ये दिसणार आहे. याशिवाय करणच्या प्रॉडक्शन हाऊसने ओशोची आई आनंद शीला याविषयी माहितीपटही जाहीर केला आहे. नेटफ्लिक्सच्या पाच प्रकल्पांव्यतिरिक्त करण यावर्षी आपल्या बर्‍याच चित्रपटांसाठी चर्चेत आहे. त्याच्या बहुप्रतिक्षित ‘तख्त’ चित्रपटामुळे तो चर्चेत आला आहे. यात रणवीर सिंग, करीना कपूर आणि आलिया भट्ट महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसू शकतात. तो अक्षय कुमारच्या 'सूर्यवंशी' आणि 'दोस्ताना 2' च्या प्रोजेक्ट्सवरही काम करत आहे. वरुण धवनच्या 'मिस्टर लेले' आणि 'रणभूमी' या चित्रपटाच्या निर्मितीमध्येही त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका असेल.

संबंधित बातम्या