Karan Kundra-Tejaswi Prakash : करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश लवकरच लग्न करणार? करण म्हणाला...

करण आणि तेजस्वी यांचे एकमेकांवर इतके प्रेम आहे की चाहत्यांना त्यांना लग्नबंधनात बघायचे आहे.
Karan Kundra and Tejaswi Prakash Marriage
Karan Kundra and Tejaswi Prakash MarriageDainik Gomantak

छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाने आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वाने सर्वांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता करण कुंद्रा यांचं हृदय सध्या फक्त तेजस्वी प्रकाशसाठीच धडधडत आहे. करण आणि तेजस्वी यांचे एकमेकांवर इतके प्रेम आहे की चाहत्यांना त्यांना लग्नबंधनात बघायचे आहे. दरम्यान, करण आणि तेजस्वीच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या आहेत. करणने त्याच्या लग्नावर भाष्य केल्यापासून ते लवकरच लग्न करणार असल्याच्या बातम्या चर्चेत आल्या आहेत.

Karan Kundra and Tejaswi Prakash Marriage
SRK Unseen Dance Video: किंग खानचा पंजाबी गाण्यावर डान्स, चाहत्यांना केले चकित

करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांनी त्यांचे नाते अधिकृत झाल्यापासून एकमेकांबद्दलचे प्रेम उघडपणे व्यक्त केले आहे. डेट नाइट्सपासून ते उघडपणे रोमान्स करण्यापर्यंत, दोघे एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करण्यास मागेपुढे पाहत नाहीत.

अलीकडेच करण 'बिग बॉस' फेम शार्दुल पंडितच्या शो 'फिल्मी मिर्ची'मध्ये पोहोचला. येथे, जेव्हा करणला त्याच्या लग्नाच्या नियोजनाबद्दल विचारण्यात आले तेव्हा अभिनेत्याने सांगितले की, तो त्याची आतुरतेने वाट पाहत आहे.

करण-तेजस्वी लवकरच लग्न करणार का?

करण त्याच्या लग्नाच्या प्लॅनिंगवर म्हणाला, "लवकरच व्हायला हवं. सर्व काही ठीक चालले आहे. सर्व काही सुंदर आहे." यासोबतच त्यांनी हेही सांगितले की, मियाँ-बीवी सहमत आहेत. अभिनेता म्हणाला, "मिया भी राझी, बीवी भी राझी, काजी भी राझी." करणच्या या विधानामुळे कदाचित करण त्याच्या लवकरच होणार्‍या लग्नाकडे बोट दाखवत असावा असा अंदाज त्याचे चाहते बांधत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com