बिपाशा-करणने दिली गुड न्युज! लग्नाच्या 6 वर्षानंतर हलणार घरात पाळणा

बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासू आणि अभिनेता करण सिंग ग्रोव्हर आई-वडील होणार आहेत.
Bipasha Basu Karan Singh Grover
Bipasha Basu Karan Singh Grover Dainik Gomantak

Bipasha Basu: बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासू आणि अभिनेता करण सिंग ग्रोव्हर आता आई-वडील होणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दोघेही लवकरच आई-वडील होणार असल्याने खूप आनंदी आणि उत्साहित आहेत आणि ते अधिकृत घोषणा करू शकतात. बिपाशा आणि करण 2015 मध्ये 'अलोन'च्या सेटवर भेटले होते. येथून दोघांच्या नात्याला सुरुवात झाली आणि 2016 मध्ये दोघांनी लग्न केले. या वर्षाच्या मार्च महिन्यातही बिपाशा बासू गरोदर असल्याची बातमी समोर आली होती. (Bipasha Basu Karan Singh Grover)

Bipasha Basu Karan Singh Grover
कन्नड स्टार किच्चा सुदीपला करायचे 'बाहुबली' सोबत काम

करणचे बिपाशासोबतचे हे तिसरे लग्न होते

बिपाशा बासू दीर्घकाळ जॉन अब्राहमसोबत रिलेशनशिपमध्ये होती. ती 2002 पर्यंत दिनो मोरियासोबत आणि त्यानंतर 2002 ते 2011 पर्यंत जॉनसोबत रिलेशनशिपमध्ये होती. तिच्या हरमन बावेजासोबतच्या रिलेशनशिपच्या बातम्याही आल्या होत्या. त्याचवेळी करण सिंहने 2008 मध्ये अभिनेत्री श्रद्धा निगमसोबत लग्न केले. मात्र लवकरच दोघांचा घटस्फोट झाला. 2012 मध्ये त्याने जेनिफर विंगलेटशी लग्न केले आणि 2014 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. आणि त्यानंतर त्याने बिपाशासोबतचे तिसरे लग्न केले.

Bipasha Basu Karan Singh Grover
Beautiful Actresses Over 40 : बॉलीवूडच्या 'या' अभिनेत्री करतात आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य

करण अनेक टीव्ही मालिका आणि रिअॅलिटी शोमध्ये दिसला

करण सिंग ग्रोव्हर हे टीव्ही जगतात मोठं नाव आहे. कसौटी जिंदगी की, परिवार, दिल मिल गए, जरा नचके देखा, झलक दिखला जा 3, फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी 3, कुबूल है यासह अनेक मालिका आणि रिअॅलिटी शोमध्ये काम केले आहे. तो अलोन आणि हेट स्टोरी 3 या चित्रपटांमध्ये दिसला. त्याचबरोबर बिपाशाने अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने अजनबी, राज, जिस्म, धूम 2 सह अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. करण आणि बिपाशाने 2020 मध्ये डेंजरस या वेब सीरिजमध्ये एकत्र काम केले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com