HBD Karan Johar: 'मुलींसारखा आवाज' म्हणत मला चिडवायचे, रात्रभर झोपायचो नाही...हा प्रसिद्ध दिग्दर्शक आता इंडस्ट्रीवर राज्य करतोय..

दिग्दर्शक करन जोहरचा आज वा वाढदिवस त्यानिमित्ताने पाहुया त्याच्या आयुष्यातल्या त्या आठवणी
HBD Karan Johar
HBD Karan Johar Dainik Gomantak

HBD Karan Johar: सतत चर्चेत असणाऱ्या कधी कधी वादग्रस्त ठरणारा आणि हिंदी चित्रपटातून कुटूंब, प्रेम शिकवणारा दिग्दर्शक करन जोहरचा आज वाढदिवस.

चला पाहुया करनच्या आयुष्यातल्या त्या वाईट आठवणी ज्यांचा त्याच्या आयुष्यावर परिणाम झाला.

करण जोहर, बॉलीवूडमधील उत्कृष्ट दिग्दर्शकांपैकी एक आहे ज्याने कुछ कुछ होता है, कभी खुशी कभी गम सारखे अनेक ब्लॉकबस्टर हिट चित्रपट दिले. करणला इंडस्ट्रीतील सर्वात बोल्ड, स्पष्टवक्ता आणि वादग्रस्त व्यक्ती म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.

नॅशनल टेलिव्हिजनवर तो बड्या सेलिब्रिटींना असे प्रश्न विचारतो, ज्याचे उत्तर देतानाही सगळ्यांना संकोच वाटतो.

करनचे खुलेआम प्रश्न आणि समोरच्या व्यक्तीची अडचण

इतरांना प्रश्न विचारणारा करण स्वत:ही त्याचे वैयक्तिक आयुष्य, लैंगिकता आणि घराणेशाही यावर आपले मत उघडपणे मांडतो. करणचे स्पष्टवक्तेपणा हे अनेक वाईट आठवणी, बालपणी मनावर झालेले आघात आणि रिजेक्शन यांचा परिणाम आहे. 

लहानपणी करणला मुलींसारखे हावभाव केल्याबद्दल टोमणे ऐकावे लागले. लोक त्याला चिडवायचे, चेष्टा करायचे. हे ट्रोलिंग आजही सुरू आहे, जेव्हा लोक त्याला गे म्हणतात. मात्र, आता करणला या सगळ्याची पर्वा नाही, कारण आता त्याचं प्रेम फक्त चित्रपट निर्मिती हेच आहे.

मुलींसारखा आवाज म्हणत माझी चेष्टा व्हायची, रात्रभर झोप येत नव्हती

करण जोहरचा जन्म २५ मे १९७२ रोजी मुंबईत झाला. करणचे वडील यश जोहर हे प्रसिद्ध निर्माते आणि धर्मा प्रॉडक्शनचे संस्थापक होते.

करणने मुंबईतील ग्रीन लॉन हायस्कूल आणि एचआर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून शिक्षण घेतले.

करण लहानपणी खूप जाड होता, पण त्याचा आवाज पातळ होता. डफली वाले हे करणचे आवडते गाणे होते आणि तो अनेकदा त्यावर नाचायचा.

त्याचे काही हावभावही मुलींसारखे होते. यामुळेच शाळेतील मुलं त्याला पॅन्सी म्हणून चिडवत असत. सततच्या या त्रासाने करनने लोकांशी बोलणे बंद केले. त्याने कुणाशी मैत्रीही केली नाही.

ट्विंकल खन्नाच्या प्रेमात झाला होता वेडा

करण जोहर आणि ट्विंकल खन्ना एकाच बोर्डिंग स्कूलमध्ये शिकले. शाळेच्या दिवसात करणला ट्विंकल आवडायची. ट्विंकलने शाळा बदलली तेव्हा करणनेही ट्विंकलच्याच शाळेत प्रवेश घेतला. एका क्षणी, करणने ट्विंकलला भेटण्यासाठी शाळेतून पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु संपूर्ण शाळेसमोर त्याला पकडले गेले आणि शिक्षा झाली.

एका इव्हेंटमध्ये करणने कबूल केले की ट्विंकल ही जगातील एकमेव मुलगी आहे जिच्यावर तो प्रेम करतो. ट्विंकलने तिच्या मिसेस फनीबोन्सच्या आत्मचरित्राच्या लॉन्चिंग इव्हेंटमध्ये देखील सांगितले की करणने तिला शाळेत प्रपोज केले होते. करण ट्विंकलला म्हणाला- मला तू आवडतेस.

वडील मला मित्रांसमोर नाचायला लावायचे, म्हणायचे बारीक हो, मी तुला हिरो बनवीन

करणचे वडील यश हे एकमेव व्यक्ती होते ज्यांना करणच्या बुजरेपणाची लाज वाटली नाही. यश जोहर यांचे मित्र जेव्हा कधी त्यांच्या घरी यायचे तेव्हा ते करनला सगळ्यांसमोर नाचायला सांगायचा. 

डफली वाले या गाण्यावर डान्स करताना करण जयाप्रदा यांच्या डान्स स्टेप्स फॉलो करत असे आणि हे पाहून त्याचे वडील टाळ्या वाजवायचे. किशोरवयात करणचे वजन 150 किलो होते तेव्हाही त्याचे वडील म्हणायचे की जर तू तुझे वजन कमी केलेस तर तू मला चित्रपटात हिरो बनवशील.

यश जोहरला वडील म्हणायला लाज वाटली

करण जोहर लहानपणी दक्षिण मुंबईमध्ये राहत होता, जिथे उच्च समाजातील काही लोकांना हिंदी चित्रपट पाहणे देखील आवडत नव्हते. त्यावेळी चित्रपटसृष्टीतील बहुतांश लोक वांद्रे येथे राहत होते. अशा परिस्थितीत करण सर्वांना सांगत असे की त्याचे वडील व्यापारी आहेत.

 करण जेव्हा 9वीत होता तेव्हा त्याचे वडील यश जोहर यांचा चित्रपट मुकद्दर का फैसला आणि बोनी कपूरचा चित्रपट मिस्टर इंडिया एकाच वेळी प्रदर्शित झाले होते. क्लॅशमध्ये, मिस्टर इंडियाने रेकॉर्डब्रेक कमाई केली तर मुकद्दर जोरात आपटला. वरळी नाक्यावर या संघर्षाचे मोठे पोस्टर लावण्यात आले होते, ज्यामध्ये यश जोहरचा मोठा फोटोही प्रदर्शित करण्यात आला होता.

अन् करनला वडिलांचा अभिमान वाटला

करणचे वडील यश जोहर यांचा मुकद्दर का फैसला जेव्हा जोरदार आपटला तेव्हा लागलेल्या पोस्टरला पाहिल्यानंतर करणच्या मित्रांनी त्याला तुझे वडील आहेत का असे विचारले तेव्हा करणने मलिन चेहरा करून म्हटले, नाही, ते माझे वडील नाहीत, कदाचित त्याच नावाचा कोणी माणूस असेल. 

माझे वडील बिझनेसमन आहेत, तुम्हाला काय वाटते माझ्या वडिलांकडे चित्रपट बनवण्याची नोकरी आहे? , पण जेव्हा अग्निपथ हा चित्रपट प्रसिद्धीच्या झोतात आला तेव्हा यश जोहर हे त्याचे वडील असल्याचे सांगताना करणला अभिमान वाटला.

काजोलने उडवली खिल्ली अन् करन रडला

16 वर्षीय करण जोहर सिनेब्लिट्जच्या एका पार्टीत पोहोचला होता, जिथे काही दिवसांपूर्वी बोर्डिंग स्कूलमधून परतलेली काजोल तिची अभिनेत्री आई तनुजासोबत पोहोचली होती. तनुजाने करण आणि काजोलला भेटायला लावले आणि नंतर एकत्र नाचायला सांगितले. दोघेही डान्ससाठी पोहोचताच काजोल करणला पाहून जोरजोरात हसायला लागली.

काजोल करनच्या कपड्यांवर हसत होती

काजोल हसताना पाहून करणने नाचणे बंद केले, पण ती हसत राहिली. वास्तविक, काजोल त्याच्या पोशाखावर हसत होती, कारण तो तरुण होता, पण मोठ्यांप्रमाणे सूट-बूट घालून आला होता. करणला खूप वाईट वाटलं की त्याने आईकडे तक्रार केली – तनुजा आंटीची मुलगी खूप वाईट आहे. त्यानंतर करन रडतच पार्टीतून निघुन गेला.

काजोल मणीरत्नम अन् करन जोहर

डीडीएलजेच्या शूटिंगदरम्यान करण आणि काजोलची मैत्री झाली. काजोल नेहमी करणला सांगायची की ती मणिरत्नमची खूप मोठी फॅन आहे आणि त्याच्या चित्रपटात काम करण्याचे स्वप्न पाहत होती. एके दिवशी काजोलला मणिरत्नमचा फोन आला आणि ते म्हणाले, 'आम्हाला तुला शाहरुखसोबत चित्रपटात कास्ट करायचे आहे. 

'करण जोक करू नकोस' असे म्हणत काजोलने फोन ठेवला. पुन्हा फोन आल्यावर मणिरत्नम म्हणाले, 'मी मणिरत्नम आहे'. जेव्हा करणला हे समजले तेव्हा तो खूप आनंदी झाला होता, परंतु मणिरत्नमला ज्या तारखा हव्या होत्या त्या करण जोहरच्या चित्रपटासाठी अडचणीच्या ठरणार होत्या.

HBD Karan Johar
The Kerala Story In Bengal : बंदी उठवताच बंगालमध्ये सुपरहिट ठरला 'द केरळ स्टोरी'...

काजोलसाठी करनने आपल्या तारखा बदलल्या

काजोलला मणिरत्नम किती आवडते हे करणला माहित होते, म्हणून तो म्हणाला की मी माझ्या चित्रपटाच्या तारखा वाढवीन, पण तू तो चित्रपट जरूर कर. हे ऐकल्यानंतरही काजोलने मणिरत्नमला नकार दिला, कारण तिने करणसोबत आधीच काँन्ट्रॅक्ट केलं होतं. 

तेव्हापासून दोघे चांगले मित्र बनले. मात्र, अनेक वर्षांनंतर शिवाय आणि ए दिल है मुश्कीलच्या संघर्षादरम्यान अजय देवगण आणि करणच्या वादामुळे त्यांची मैत्री तुटली. करणने आपल्या आत्मचरित्रात काजोलच्या नावाने एक चाप्टर लिहिला आणि हे देखील सांगितले की आता दोघेही पूर्वीसारखे मित्र बनू शकणार नाहीत आणि करणला काही फरक पडत नाही.

HBD Karan Johar
Asur 2 First Look : पुन्हा एकदा रहस्यं अन् शिगेला जाणारी उत्सुकता, असुर 2 मधला अर्शदचा फर्स्ट लूक बघाच..

शाहरुख खानचा तो सल्ला

करण जोहरने वडिलांच्या मदतीने अभिनेता म्हणून करिअरला सुरुवात केली. त्यांनी पहिल्यांदा दूरदर्शनच्या इंद्रधनुष शोमध्ये काम केले. त्यानंतर त्याने दिग्दर्शक आदित्य चोप्राला दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे या चित्रपटात असिस्ट केले आणि चित्रपटात शाहरुखच्या मित्राची भूमिकाही केली. शूटिंगदरम्यान शाहरुखने करणला सल्ला दिला की, त्याने स्वत: चित्रपट बनवावे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com