तैमूर आणि जहांगीर यांच्या ट्रोलिंगवर करीना झाली व्यक्त
Kareena Kapoor KhanDainik Gomantak

तैमूर आणि जहांगीर यांच्या ट्रोलिंगवर करीना झाली व्यक्त

अलीकडेच करीना कपूर खानने तिची मुले तैमूर आणि जहांगीर यांना त्यांच्या नावांमुळे ट्रोल केले जात असल्याचे उघड केले आहे.

अलीकडेच करीना कपूर खानने (Kareena Kapoor Khan) तिची मुले तैमूर आणि जहांगीर (Taimur and Jehangir) यांना त्यांच्या नावांमुळे ट्रोल (trolls) केले जात असल्याचे उघड केले आहे.

नुकत्याच एका न्यूज पोर्टलला (news portal) दिलेल्या मुलाखतीत करीना म्हणाली की तिला हे खूपच भयंकर वाटले की तिच्या मुलांच्या नावामुळे मुलांना आणि कुटुंबाला ट्रोल केले जात आहे. तिच्या मते, ती फक्त मुलांची सुंदर नावे आहेत. मुलांना फक्त त्यांच्या नावावरून ट्रोल करणे हे अकल्पनीय आहे. तथापि, अभिनेत्रीने या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करत यामधून बाहेर पडली आहे. करीना पुढे म्हणाली की ती तिच्या आयुष्याकडे ट्रोल्सद्वारे पाहू शकत नाही.

Kareena Kapoor Khan
KBC च्या फॅन्टास्टिक फ्रायडेचा प्रोमो व्हायरल , गोल्डन बॉय नीरज चोप्रा हॉट सीटवर

सैफ अली खानची बहीण सबा अली खानने अलीकडेच जहांगीर नावावरून एक पोस्ट शेयर केली होती, सैफ अली खान आणि करीना कपूर यांच्या दुसर्‍या मुलाचे नाव जहांगीर ठेवण्यावर तिने तीव्र प्रतिक्रिया दिली होती.

करीना आणि जेह यांच्या मालदीवच्या अलीकडच्या सहलीतील एक फोटो शेअर करताना तिने लिहिले, ‘मॉमा एन जान जेह. जेव्हा एखादी आई तिच्या मुलाला तिच्यामध्ये वाढवते आणि त्याला त्याचे आयुष्य देते फक्त तीला आणि वडीलांना हे ठरवण्याचा अधिकार असतो.

तैमूर आणि जहांगीर हे दोघेही सर्वात आवडते स्टार किड्स आहेत. जेव्हा ते बाहेर असतात तेव्हा त्यांना क्लिक करण्याची संधी कोणी सोडत नाही. त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com