सीतेच्या भूमिके बद्दल करीना कपूरने सोडले मौन

एका चित्रपटात सीतेची भूमिका करण्यासाठी करीना कपूरने 12 कोटी रुपयांची मागणी केल्यामुळे ती चांगलीच चर्चेत होती.
सीतेच्या भूमिके बद्दल करीना कपूरने सोडले मौन
Kareena KapoorDainik Gomantak

एका चित्रपटात (film) सीतेची भूमिका करण्यासाठी करीना कपूरने (Kareena Kapoor) 12 कोटी रुपयांची मागणी (Rs 12 crore to play Sita) केल्यामुळे ती चांगलीच चर्चेत होती. यामुळे करीनाची जोरदार खिल्ली उडवली गेली. या संपूर्ण प्रकरणात करीना कपूरने आता मौन सोडले आहे.

Kareena Kapoor
'Manike Mage Hithe' या श्रीलंकन गाण्यावर गोवणं कलाकारांची धूम; पाहा Video

एवढ्या मोठ्या मगणी वरून निर्माते विचारात पडले होते, सीता मातेच्या भूमिकेसाठी करीना कपूरचे नाव समोर आल्यानंतर हिंदूवादी संघटनांनी सोशल मीडियावर तीव्र विरोध केला होता. परंतु या संपूर्ण प्रकरणात करीना कपूरने आता मौन तोडले आहे.

करीना कपूर एका मुलाखतीत म्हणाली की मी फक्त मला पाहिजे तेच मागितले. काही वर्षांपूर्वीपर्यंत चित्रपटात पुरुष आणि महिला कलाकारांना समान वेतन मिळण्याबाबत चर्चा नव्हती. पण आता बऱ्याच लोकांनी याबद्दल उघडपणे बोलायला सुरुवात केली आहे. मला वाटते महिलांनाही पुरुषांइतकाच सन्मान दिला पाहिजे. हा फी किंवा मागणीचा प्रश्न नाही तर महिलांच्या सन्मानाचा प्रश्न आहे. माझा विश्वास आहे की गोष्टी बदलल्या जातील.

Kareena Kapoor
अनिल कपूरने अरबाज खानच्या शोमध्ये सांगितला 'जवानी का राज'

या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी आलुक्ष देसाई यांना देण्यात आली होती तसेच या चित्रपटासाठी करीनाला 8-10 महिन्यांचे प्रशिक्षण द्यावे लागले. मात्र, जेव्हा करीनाने या चित्रपटासाठी 12 कोटी रुपयांची मागणी केली तेव्हा लोकांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली. फ्रंटवर्कवर करीना कपूर सध्या 'लाल सिंह चड्ढा' चित्रपटाचे शूटिंग करत आहे. अलीकडेच ती मुंबईत आमिर खानसोबत चित्रपटाचे काही सीन शूट करताना दिसली. करीनाने काही दिवसांपूर्वी तिचे प्रेग्नेन्सी बायबल हे पुस्तक लाँच केले होते. या पुस्तकात त्यांनी मोठा मुलगा तैमूर आणि लहान मुलगा जेह यांच्या गर्भधारणेचा अनुभव सांगितला आहे. जेहचा जन्म फेब्रुवारी 2021 मध्ये झाला होता आणि आता तो 6 महिन्यांचा आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com