Kareena Kapoor: आंतरधर्मीय विवाहाचा नात्यावर काय होतो परिणाम? करिना म्हणाली, 'मी अन् सैफ...'

Kareena Kapoor: करिना म्हणते, आपली जास्त शक्ती आंतरधर्मीय विवाह, वयातले अंतर अशा गोष्टींवर चर्चा करण्यात वाया जाते.
Kareena Kapoor and Saif Ali Khan
Kareena Kapoor and Saif Ali KhanInstagram

Kareena Kapoor: बॉलीवूडची लाडकी बेबो अर्थात करिना कपूर पून्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे. आता लवकरच ती ओटीटीवर डेब्यू करणार आहे.

करिनाने नुकतीच इंडियन एक्सप्रेस अड्डाला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीदरम्यान तिने आपल्या आयुष्यातल्या अनेक पैलूबद्दल खुलासा केला आहे. तिने सैफ अलि खान बरोबर केलेल्या आंतरधर्मीय विवाहाबद्दल देखील भाष्य केले आहे.

आंतरधर्मीय विवाहावर काय म्हणाली करिना?

करिना म्हणते, आपली जास्त शक्ती आंतरधर्मीय विवाह, वयातले अंतर अशा गोष्टींवर चर्चा करण्यात वाया जाते. पण मला वाटते, तुमच्या आयुष्यात सर्वात मोठी गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे आनंद. जर तुम्हाला एकत्र येऊन आनंद निर्माण करता येत असेल, तुम्ही एकमेकांसोबत खुश असाल तर धर्म, जात, वयातले अंतर या गोष्टी तुमच्या जगण्याच्या आड येत नाहीत.

मी आणि सैफ जरी वेगवेगळ्या धर्माला मानत असलो तरी आम्ही एकमेकांबरोबर खूष आहोत, आम्ही आमचे एकत्र असणे आम्ही साजरे करत असतो. आम्हाला एकमेकांसोबत मजा येते, वेळ घालवायला आवडतो. वय किती आहे किंवा वयात अंतर किती आहे, तुम्ही कोणत्या धर्माला मानता यापेक्षा एकमेकांप्रति आदर आणि प्रेम किती आहे हे कोणत्याही नात्यात जास्त महत्वाचे ठरते.

पुढे ती म्हणते- सैफकडे पाहून तो ५३ वर्षाचा झाला आहे, असे कोणालाही वाटू शकत नाही इतका तो आजही फिट आणि हॉट दिसतो. मला आनंद आहे की, मी त्याच्यापेक्षा १० वर्षांनी लहान आहे असेही करिनाने म्हटले आहे.

Kareena Kapoor and Saif Ali Khan
Shehnaaz Gill: चित्रपट भूमीचा चर्चा मात्र शहनाजची; 'थँक्यू फॉर कमिंग' चित्रपटातील पहिले गाणे रिलिज

दरम्यान, करिना 'जाने जान' या चित्रपटातून ओटीटीवर पदार्पण करणार आहे. या चित्रपटात जयदीप अहलावत, विजय वर्मा आणि लिन लैश्राम हे देखील मुख्य भूमिकेत दिसून येत आहे. आता बेबोची जादू पून्हा चालणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com