Kareena Kapoor: चित्रपट बॉयकॉट झाले तर मनोरंजन कसं होणार? करीना कपूर बॉयकॉट ट्रेंडवर थेटच बोलली.

अभिनेत्री करीना कपूरने बॉलिवूडच्या काही फिल्म्सवर बहिष्कार टाकण्याच्या ट्रेंडवर एक मोठे विधान केले आहे.
Kareena Kapoor
Kareena KapoorDainik Gomantak

kareena kapoor talk about boycott trend : करीना कपूर खान(Kareena Kapoor Khan)  आपल्या व्यक्त होण्यावर विशेष भर देते. एक यशस्वी अभिनेत्री म्हणुन करीना कपूरने इंडस्ट्रीवर एक वेगळी छाप सोडली आहे. यापूर्वी कित्येकदा ती अनेक मुद्द्यावर मोकळेपणाने बोलली आहे. करिनाने यापूर्वीही अनेक गोष्टी केल्या आहेत आणि त्यामुळे ती ट्रोलर्सच्या निशाण्यावरही आली आहे. 

काही महिन्यांपूर्वी करीनाचा 'लाल सिंग चढ्ढा' आला तेव्हा बॉयकॉट ट्रेंड शिगेला पोहोचला होता. करीना ( करीना कपूर खान ) ने त्या काळात बोललेल्या गोष्टींमुळे ट्रोलर्सनी तिच्यावर निशाणा साधला.

 आता पुन्हा एकदा करीनाने बॉलीवूडच्या बॉयकॉट कल्चरवर नाराजी व्यक्त केली आहे तिने म्हटले आहे की, 'मी या गोष्टीशी अजिबात सहमत नाही. असे झाले तर आम्ही मनोरंजन कसे करणार, तुमच्या जीवनात आनंद आणि आनंद कसा येईल, ज्याची मला आणि प्रत्येकाला गरज आहे ;आणि चित्रपट नसतील तर मनोरंजन कसे होईल. करीनाला या बॉयकॉट ट्रेंडवर प्रचंड आक्षेप व्यक्त केला आहे

अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर बॉयकॉट बॉलिवूड हा हॅशटॅग ट्रेंड करू लागला. पण; 2022 मध्ये लाल सिंग चड्ढा, लिगर, ब्रह्मास्त्र आणि रक्षा बंधन यांसारखे अनेक चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी, नेटिझन्सनी त्यांच्यावर बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली. अशा ट्रेंडचा परिणाम काही चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर मोठ्या प्रमाणावर झाला.

 लाल सिंग चड्ढा रिलीज होण्यापूर्वी ट्विटरवर #BoycottLaalSinghCaddha हा हॅशटॅग ट्रेंड करण्यास सुरुवात केली आणि लोकांना चित्रपट पाहू नका असं आवाहनही केलं होतं.

पूर्वी ही खूप छोटी गोष्ट वाटत होती. फक्त ट्रोलर्सचा एक समूह चित्रपटाला विरोध करायचा, पण, जेव्हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होत गेले तेव्हा लोकांना याचं गांभीर्य लक्षात आलं. 

करीनाच्या भूतकाळातील काही वादग्रस्त विधानेही ऑनलाइन समोर आली आहेत.यापूर्वीही करीनाने अशी काही विधाने केली होती ज्यामुळे वाद निर्माण झाला होता.

Kareena Kapoor
Shah Rukh Khan: 'पठाण' रिलीज होण्यापुर्वीच किंग खानने चाहत्यांना दिलं सरप्राइज; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

लिगर, ब्रह्मास्त्र यांसारख्या चित्रपटांवरही अनेकांनी बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले होते. पण ब्रह्मास्त्रने बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय केला, 2022 मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणून ब्रह्मास्त्रने रेकॉर्ड केला . शाहरुख आणि दीपिका पदुकोणच्या 'पठाण'च्या बाबतीत हा ट्रेंड पुन्हा सुरू झाला.

 या चित्रपटातील 'बेशरम रंग' हे गाणे १२ डिसेंबर रोजी ऑनलाइन रिलीज झाले आणि त्याची जोर दार चर्चा झाली. अनेकांना हा पेपी ट्रॅक आवडला, तर काहींना भगवा आणि हिरव्या रंगाच्या पोशाखाच्या वापरावर 'बेशरम रंग' आक्षेपार्ह वाटला. इंदूरमध्येही कार्यकर्त्यांच्या एका गटाने पठाण आणि 'बेशरम रंग' या गाण्याचा निषेध केला आणि दीपिका आणि शाहरुखचे पुतळे जाळले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com