Jane Jaan Trailer : हरवलेली व्यक्ती, संशयास्पद गोष्टी अन् पोलीस तपास... करीनाच्या 'जाने जा'चा हटके ट्रेलर पाहाच

अभिनेत्री करीना कपूरचा ओटीटी डेब्यू चित्रपट 'जाने जा' चित्रपट सध्या ट्रेलर रिलीज झाल्यामुळे सोशल मिडीयावर चर्चेत आहे.
Jane Jaan Trailer
Jane Jaan TrailerDainik Gomantak

अभिनेत्री करीना कपूरची डेब्यू फिल्म 'जाने जा' तिच्या चाहत्यांसाठी उत्सुकतेचा विषय ठरली आहे. या चित्रपटात बेबो बऱ्याच काळाच्या ब्रेकनंतर चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

करीना कपूर जाने जान या चित्रपटातून तिचे ओटीटी पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे आणि त्याचा ट्रेलर रिलीज झाला आहे. सुजॉय घोष दिग्दर्शित या चित्रपटात करीना विजय वर्मा आणि जयदीप अहलावत यांच्यासोबत आहे. 

हा चित्रपट केगो हिगाशिनोच्या द डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्स या कादंबरीवर आधारित आहे. ट्रेलरमध्ये कादंबरीचं रुपांतर असलेला हा चित्रपट तुम्हाला मनोरंजनाचं आश्वासन देतो.

विजय आणि करीना

जाने जान या चित्रपटात करीना माया डिसूझाची भूमिका साकारत आहे जी एका गुंतागुंतीच्या रिलेशनशिपमध्ये आहे. जयदीप अहलावतने साकारलेल्या तिच्या शेजारी राहणाऱ्या पात्राला अर्थात नरेनला याची कल्पना आहे. 

विजयने मायाच्या हरवलेल्या पतीचा शोध घेणाऱ्या करण नावाच्या पोलिसाची भूमिका साकारली आहे. ट्रेलरच्या शेवटी करीना कपूर आणि विजय एका इंटिमेट मुव्हमेंटमध्ये दिसतात.

रिलीज डेट

द डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्स. ही कादंबरी गणितातील हुशार आणि त्याच्या युनिव्हर्सिटी बॅचमेट यांच्यातील बुद्धीच्या लढाईची गोष्ट सांगणारी कादंबरी आहे.

तसं पाहता हा चित्रपट एका हत्येच्या तपासाची गोष्ट सांगतो. हा चित्रपट 21 सप्टेंबरला नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.

विजय म्हणाला

जाने जानमध्ये काम करण्याबद्दल बोलताना, विजय वर्मा यांनी News18 ला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले “मी अनेक कारणांमुळे उत्साहित आहे. मी तुम्हाला एवढेच सांगू शकतो की ती एका क्लासिक, सर्वाधिक पसंत केलेल्या मर्डर मिस्ट्री कादंबरीवर आधारित आहे.

 कादंबरी वाचलेल्या आणि त्याबद्दल माहिती असलेल्या लोकांचा एक मोठा वर्ग आहे आणि त्याभोवती एक मजबूत फॅन्डम आहे". 

विजय पुढे म्हणाला मला विश्वास आहे की सुजॉय घोष एक उत्कृष्ट थ्रिलर बनवेल. करीना आणि जयदीपसोबत काम करणे हा आनंददायी अनुभव होता. मी प्रेक्षकांइतकाच याबद्दल उत्सुक आहे."

करीनासोबत काम करण्याचा आपला अनुभव सांगताना विजय पुढे म्हणाला, " करीनासोबत स्वत:ला पाहणे खूप आनंददायक होते."

एका प्रेस स्टेटमेंटमध्ये, करीना म्हणाली, “मी नेटफ्लिक्सवर खूप खास प्रोजेक्ट घेऊन येण्यास उत्सुक आहे. 

23 वर्षांनंतर, हे नवीन लाँच झाल्यासारखे वाटते! प्रेक्षक मला अशा भूमिकेत पाहतील जी मी यापूर्वी कधीही साकारली नाही, ज्याची कथा इतकी अनोखी आणि रोमांचक आहे. 

Jane Jaan Trailer
Jasmin Bhasin : ट्रोलिंग, अफवा आणि बलात्काराच्या धमक्या...जास्मिन भसीन पहिल्यांदाच बोलली 'डिप्रेशन'बद्दल...

जयदिप अहलावत म्हणतो

"Netflix ने नेहमीच जगाच्या अनेक देशांतील आगळे वेगळे चित्रपट सर्वात अस्सल पद्धतीने प्रदर्शित केले आहेत. कलाकारांना त्यांनी पाठबळ दिले आहे आणि त्यांना 190 देशांपर्यंत पोहोचण्यासाठी एक व्यासपीठ दिले आहे! मला वाटते की माझ्या सर्वोत्कृष्ट भूमिकांपैकी एक भूमिकेवर प्रेक्षकांची प्रतिक्रिया पाहण्यासाठी मी उत्सुक आहे!"

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com