Video: कार्तिक आर्यनचा मुंबईच्या पावसात फुटबॉल स्वॅग...

कार्तिक आर्यनचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
Kartik Aaryan
Kartik AaryanDainik Gomantak

कार्तिक आर्यनचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये कार्तिक मुंबईच्या मुसळधार पावसात फुटबॉल खेळताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये त्याची एनर्जी आणि स्वॅग पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ कार्तिकने स्वतः त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे, जो पाहून त्याचे चाहते आनंदी झाले आहेत. (Kartik Aaryan playing football)

Kartik Aaryan
Video: मेस्सी अन् रोनाल्डोला लाजावले असा फुटबॉल मॅचमधील टायगर श्रॉफचा गोल

"पाऊस आणि फुटबॉल, दोन्ही माझ्या आवडत्या गोष्टी एकत्र," असे कॅप्शन हा नवीन व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करताना कार्तिक आर्यनने दिले आहे. फुटबॉल व्हिडिओमध्ये, निळ्या रंगाची जर्सी घातलेला कार्तिक मुसळधार पावसात मोठ्या उत्साहाने फुटबॉल खेळताना दिसत आहे. कार्तिकचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. काही तासांपूर्वी शेअर केलेला हा व्हिडिओ 150 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

कार्तिक आर्यन सध्या त्याच्या नुकत्याच रिलीज झालेल्या 'भूल भुलैया 2' या चित्रपटाच्या बंपर यशाचा आनंद साजरा करत आहे. त्याच्या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. त्याच्या चित्रपटाचा उत्साह अजून कमी झालेला नाही. या चित्रपटात चाहत्यांना कार्तिक आर्यनचे काम खूप आवडले, त्यानंतर कियारा अडवाणीसोबतची त्याची जोडी सर्वांच्या मनाला भिडली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 200 कोटींचा गल्ला गाठला आहे.

Kartik Aaryan
Bollywood Actress: लग्नानंतर 'या' अभिनेत्रींनी फिल्मी दुनियेला केले गुड-बाय

'भूल भुलैया 2' च्या यशाच्या आनंदात निर्माता भूषण कुमार यांनी कार्तिक आर्यनला भारतातील पहिली जीटी ही पॉश ऑरेंज मॅक्लारेन लक्झरी कार भेट दिली आहे . अलीकडेच कार्तिक या आलिशान कारसह मुंबईच्या रस्त्यांवर फिरताना दिसला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या लक्झरी कारची किंमत 3.73 कोटी आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com