कार्तिक आर्यन सांगतोय मास्क न वापरणाऱ्या लोकांचं काय होत

दैनिक गोमंतक
रविवार, 2 मे 2021

मास्क वापराबद्दल जनजागृती करणारी एक पोस्ट कार्तिक आर्यनने सध्या सोशल मीडियावर शेअर केली आहे.

मास्क वापरा, सॅनिटायझर वापरा, सोशल डिस्टनसिंगचे पालन करा हे कोरोना प्रतिबंध नियम पाळण्याचे आवाहन वारंवार आपल्याला केले जात असल्याचे पाहायला मिळते आहे. देशात सध्या कोरोना संसर्गाचा दुसऱ्या लाटेमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असल्याने या नियमांचे पालन करणे अत्यंत महत्वाचे झाले आहे. याच गोष्टीची जनजागृती करणारी पोस्ट अभिनेता कार्तिक आर्यनने केलेली पाहायला मिळाली आहे.(Kartik Aryan tells what happens to people who don't wear masks)

कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी मास्क या एक उत्तम उपाय असल्याचे सिद्ध झाले आहे. मास्कमुळे कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यास मदत होते. मास्क वापराबद्दल जनजागृती करणारी एक पोस्ट कार्तिक आर्यनने सध्या सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अभिनेता कार्तिक आर्यन एका डायनासॉरच्या प्रतिकृती जवळ बसला असून, डायनासॉर आ वासून कार्तिक आर्यनला खातो की काय असा भास होतो आहे. या फोटो सोबत "मास्क न वापरणाऱ्या लोकांच्या तोंडात कोरोना असा जातो" असे लिहीत कार्तिक आर्यनने फोटो शेअर केला आहे.

मात्र  विशेष म्हणजे या फोटो मध्ये कार्तिक आर्यन स्वतः मास्क शिवाय दिसून येतो आहे.

संबंधित बातम्या