Katrina Kaif अन् विकी कौशलने पहिल्यांदाच शेअर केली स्क्रीन, फोटो झाले व्हायरल

Katrina Kaif And Vicky Kaushal: कतरिना कैफ आणि विकी कौशल डिसेंबर 2021 मध्ये विवाहबंधनात अडकले.
Katrina Kaif And Vicky Kaushal
Katrina Kaif And Vicky KaushalTwitter/ @itsewrem

Katrina Kaif And Vicky Kaushal: कतरिना कैफ आणि विकी कौशल डिसेंबर 2021 मध्ये विवाहबंधनात अडकले. तेव्हापासून हे जोडपे बी-टाऊनचे सर्वाधिक चर्चेत असलेले सेलिब्रिटी कपल बनले आहे. दोघांच्या लग्नाची चर्चा चांगलीच रंगली होती. लग्नानंतर ते अवॉर्ड फंक्शन्स आणि इतर कार्यक्रमांमध्येही एकत्र दिसले होते. जेव्हा जेव्हा त्यांचे एकत्र फोटो येतात तेव्हा ते व्हायरल होतात. आताही त्यांच्या फोटोंमुळे चाहत्यांची उत्सुकता नक्कीच वाढली असेल. कतरिना आणि विकीने पहिल्यांदाच स्क्रीन शेअर केली आहे, पण ती कोणत्याही चित्रपटासाठी नाही.

व्हायरल झाले फोटो

विकी आणि कतरिनाने एका कंपनीसाठी फोटोशूट केले आहे. प्रवासी सेवा देणाऱ्या कंपनीचा विकी ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनला आहे. या जाहिरातीसाठी विकी आणि कतरिनाने पहिल्यांदाच एकत्र फोटोशूट केले आहे. ट्विटरवर त्यांचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये ते वेगवेगळ्या स्टाइलमध्ये पोज देताना दिसत आहेत.

Katrina Kaif And Vicky Kaushal
Katrina Kaif Brother: बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री करतेय कतरिना कैफच्या भावाला डेट

विकी आणि कतरिनाला प्रवास करायला आवडतो

जाहिरातीच्या फोटोशूटमध्ये त्यांनी कॅज्युअल हॉलिडे आउटफिट परिधान केला आहे. विकी आणि कतरिनाने त्यांच्या निवेदनात म्हटले आहे की, 'या जाहिरातीत एकत्र काम करण्यासाठी आम्ही दोघेही खूप उत्सुक होतो. आम्हाला प्रवास करायला आवडते.'

Katrina Kaif And Vicky Kaushal
Katrina Kaif B'Day: कतरिना कैफ लग्नानंतर विकीसह साजरा करणार पहिला वाढदिवस

दोघेही करण जोहरच्या शोमध्ये पोहोचले होते

विकी आणि कतरिना करण जोहरच्या (Karan Johar) 'कॉफी विथ करण' शोमध्ये सहभागी झाले होते. मात्र दोघेही वेगवेगळ्या एपिसोडमध्ये दिसले होते. विकी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​शोचा एक भाग बनले तर सिद्धांत चतुर्वेदी आणि इशान खट्टर कतरिनासोबत 'फोन भूत' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पोहोचले होते. 'फोन भूत' व्यतिरिक्त कतरिनाचे आगामी चित्रपट 'टायगर 3', 'मेरी ख्रिसमस' आणि 'जी ले जरा' हे आहेत. विकीकडे सध्या मेघना गुलजार यांचा 'साम बहादूर' आहे. यासोबतच 'गोविंदा नाम मेरा' आणि 'द ग्रेट इंडियन फॅमिली' हे चित्रपट आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com