Phone Bhoot Teaser: कतरिना कैफचा हॉरर- कॉमेडी 'फोन भूत' चा टीझर आऊट

Katrina Kaif Phone Bhoot Teaser: कतरिना कैफचा आगामी चित्रपट 'फोन भूत' चा टीझर आज रिलीज झाला असुन या चित्रपटात ती ईशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदीसोबत दिसणार आहे.
Phone Bhoot Teaser:
Phone Bhoot Teaser:Dainik Goamntak

बॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेत्री कतरिना कैफने 9 डिसेंबर 2021 रोजी विकी कौशलशी लग्न केले. लग्नानंतर कतरिनाच्या कोणत्याही नवीन प्रोजेक्टची घोषणा करण्यात आली नव्हती. लग्नानंतर कतरिनाही रूपेरी पडद्यापासून दूर राहली. आज कतरिनाने सोशल मीडियावर तिच्या आगामी चित्रपटाबद्दल एक मोठे अपडेट शेअर केले आहे. कतरिनाने (Katrina) तिच्या आगामी 'फोन भूत' या चित्रपटाचा टीझर व्हिडिओ शेअर केला आहे. (Katrina Kaif Phone Bhoot Teaser news)

फोन भूतचा टीझर व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करताना कतरिनाने लिहिले - 'एक भयानक कॉमेडी येत आहे.' यात कतरिनासोबत (Katrina kaif) सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. पण मध्यंतरी त्याबद्दल काहीच अपडेट नव्हते. पण अलिकडेच कतरिनाने चित्रपटचा धमकेदार टीझर (Teaser) शेअर केला आहे.

फोन भूतचा टीझर 22 सेकंदांचा आहे. या चित्रपटात कतरिना कैफ, ईशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन गुरमीत सिंग यांनी केले आहे. रितेश सिंधवानी आणि फरहान अख्तर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. टीझरच्या एका झलकमध्ये एक महिला भितीदायक अवस्थेत दिसत आहे.

फोन भूतचे शूटिंग 2020 मध्ये पूर्ण झाले आहे. सध्या या चित्रपटाच्या कथेबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. हा चित्रपट 15 जुलै 2022 रोजी रिलीज होणार आहे. फोन भूत व्यतिरिक्त कतरिना सलमान खानसोबत 'टायगर 3', 'जी ले जरा' आणि 'मेरी ख्रिसमस' सारख्या चित्रपटांमध्येही दिसणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com