Katrina-Vicky Wedding: व्हीआयपी पाहूण्यासाठी खास व्यवस्था

बॉलिवूड (Bollywood) स्टार विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina kaif) लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.
Katrina-Vicky Wedding: व्हीआयपी पाहूण्यासाठी खास व्यवस्था
Katrina-Vicky Wedding: व्हीआयपी पाहूण्यासाठी खास व्यवस्था Dainik Gomantak

बॉलिवूड (Bollywood) स्टार विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina kaif) लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. बॉलीवूडच्या या वर्षाच हे लग्न सर्वात जास्त चर्चेत असणार आहे. सूत्रांवर विश्वास ठेवला तर हे कपल डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात लग्नबंधनात अडकणार आहेत. कतरिना तिच्या लग्नाबद्दल खूप उत्सुक असून तिने त्यासाठी तयारी सुरू केली आहे. लग्नात मुलीला सर्वात जास्त उत्सुकता असते ती म्हणजे लग्नाच्या तारखेसाठीचा तिचा आऊटफिट. कतरिनानेही आतापासून तिच्या आउटफिटची तयारी सुरू केली आहे. तिला लवकरात लवकर लग्नाचा आऊटफिट निवडून आराम करायचा आहे. तसेच लग्नात व्हीआयपी पाहूण्यासाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे.

* या हॉटेल्सचे बूकिंग झाले आहे

रणथंबोर रोडजवळील अनेक पंचतारांकित हॉटेल्समध्ये व्हीआयपी पाहूनण्यांसाठी बूकिंग करण्यात आले आहे. हे सर्व पाहुणे मुंबईहून येणार आहेत. या सर्वांना जयपूर विमानतळावरुन आलिशान वाहनांनी सवाई माधोपुरपर्यंत आणण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. एका अहवालानुसार पाहुण्यांना विमानतळावरुन बीएमडब्ल्यू,ऑडि आणि रेंज रोव्हर वाहनाद्वारे सवाई माधोपुरला आणले जाईल. याशिवाय दोन व्हॅनिटी व्हॅनचीही व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सुमारे 50 चालकांच्याराहण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. त्याचबरोबर सिक्स फोर्टमध्ये कतरिना आणि विकीच्या कुटुंबायांसाठी अनेक रूम्स बूक करण्यात आल्या आहेत.

* टायगर सफारीचा पाहुणे घेतील आनंद

7 ते 9 डिसेंबर दरम्यान कतरिना आणि विकीच्या लग्नाचे विधी पूर्ण होणार आहेत. यादरम्यान पाहुणे रणथंबोरमध्ये टायगर सफरीचा आनंद घेतील. लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांच्या मनोरंजनात कोणतीही कमतरता पडू नये यासाठी कतरिना आणि विकी अजूनही तयारीत व्यस्त आहेत.

* 100 बाऊन्सर तैनात असतील

या शाही लग्नाला येणाऱ्या व्हीआयपी पाहुण्यांची काळजी घेण्यासाठी एकूण 100 बाऊन्सरचीही व्यवस्था करण्यात आली आहे. जयपूरच्या एमएच सिक्युरिटी कंपनीने व्हीआयपी पाहुण्याना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही यांकि काळजी घेण्याची जबाबदारी घेतली आहे. कतरिना कैफ आणि विकी कौशल यांना हे लग्न केवळ त्यांच्यासाठीच नव्हे तर त्यांच्या आनंदात सहभागी होणाऱ्या पाहुण्यांसाठीही संस्मरणीय व्हावे, अशी त्यांची इच्छा आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com