विकी आणि कैतरिनामध्ये का रे दुरावा

विकी कौशल आता त्याच्या शूटिंगसाठी रवाना झाला आहे. पत्नी कतरिनाने अत्यंत रोमँटिक पद्धतीने त्याला बाय केले.
विकी आणि कैतरिनामध्ये का रे दुरावा

Bollywood Vicky Katrina News

Dainik Gomantak

बॉलिवूड अभिनेते विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) यांनी लग्नानंतरचे पहिले नवीन वर्ष साजरे केले आहे. मात्र, नवीन वर्ष एकत्र साजरे केल्यानंतर बॉलिवूडमधील (Bollywood) हे नवविवाहित जोडपे लवकरच (Bollywood Vicky Katrina News) दूर झाले. विकी कौशल आता त्याच्या शूटिंगसाठी रवाना झाला आहे. पत्नी कतरिनाने अत्यंत रोमँटिक पद्धतीने त्याला बाय केले.

<div class="paragraphs"><p>Bollywood Vicky Katrina News</p></div>
RRR चे प्रदर्शन आले पुढे ढकलण्यात, कोरोनामुळे प्रेक्षकांना करावी लागणार प्रतिक्षा !

विक्की कौशलने (Vicky Kaushal) 31 डिसेंबरच्या रात्री आपल्या दुल्हनियासोबत नवीन वर्ष साजरे करण्यासाठी मुंबई सोडली होती, जे कतरिनासाठी मोठ्या आश्चर्यापेक्षा कमी नव्हते. यानंतर दोघांनी 31 तारखेच्या रात्री एकत्र साजरे करत 2022 चे जल्लोषात स्वागत केले. मात्र, 1 जानेवारीला विकी पुन्हा कामावर रुजू झाला असुन चित्रपटाच्या शूटिंगसाठी विकी कौशल इंदूरला रवाना झाला.

त्याचवेळी कतरिना कैफनेही (Katrina Kaif) एअरपोर्टवर जाऊन अभिनेत्याला बाय-बाय केले. जिथे कतरिनाने विक्काला किस करत निरोप दिला. इतकेच नाही तर कतरिना आणि विकीचे हे क्षण तिथे उपस्थित असलेल्या चाहत्यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. आता कतरिना आणि विकी कौशलचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. या नवविवाहित जोडप्याच्या प्रेमाचे चाहते कौतुक करत आहेत.

<div class="paragraphs"><p>Bollywood Vicky Katrina News</p></div>
नेहा कक्करला गोव्यात केलेला कॉन्सर्ट पडला महागात

विकी कौशल सध्या इंदूरमध्ये त्याच्या 'लुका-चुप्पी 2' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यापूर्वी विकी कौशल ख्रिसमससाठी शूटिंग सोडून मुंबईला पोहोचला होता. तर दुसरीकडे कतरिना कैफही तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. कतरिना लवकरच साऊथ सुपरस्टार विजय सेतुपतीसोबत येणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com