जयेशभाई पेक्षा रॉकीभाई सरस; बॉक्स ऑफिसवर KGF-2 चे वर्चस्व कायम

'KGF Chapter 2' चित्रपटाने पाचव्या आठवड्याच्या पहिल्या शुक्रवारी 2.32 कोटींची कमाई केली.
जयेशभाई पेक्षा रॉकीभाई सरस; बॉक्स ऑफिसवर KGF-2 चे वर्चस्व कायम
Movie posters Dainik Gomantak

साऊथ सुपरस्टार यशच्या 'केजीएफ चॅप्टर 2' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीने 425 कोटींच्या कमाईचा टप्पाही पार केला आहे. शुक्रवारी प्रदर्शित झालेला रणवीर सिंगचा 'जयेशभाई जोरदार' चित्रपट KGF-2 पुढे तग धरू शकेल का? याबाबत सिनेप्रेमींच्या मनात शंका आहे. (KGF-2 beats Jayeshbhai Jordaar in box office collection on Saturday)

Movie posters
अभिनेत्री शुभवी चोक्सीने सांगितले इंडस्ट्रीचे 'सत्य', केला मोठा खुलासा

'जयेशभाई जोरदार' चित्रपटाकडे प्रेक्षक आकर्षित न झाल्याने हिंदी चित्रपटसृष्टीत चांगलीच खळबळ उडाली आहे. एक महिन्यापूर्वी प्रदर्शित झालेला KGF-2 शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या चित्रपटांवर भारी पडत आहे.

'जयेशभाई जोरदार' चित्रपट KGF-2 ला जोरदार टक्कर देणार अशी अनेकांना आशा होती. मात्र, तसे झाले नाही. रणवीर सिंगच्या चित्रपटाने पहिल्या दिवशी सुमारे 3 कोटींचा गल्ला जमवला, तर शनिवारी चित्रपटाने 4 कोटींपर्यंत मजल मारली. KGF 2 चे 31व्या दिवसाचे कलेक्शन रणवीर सिंगच्या ‘जयेशभाई जोरदार’ चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाच्या कलेक्शनपेक्षा जास्त होते.

Movie posters
कपिल शर्माचा शो होणार बंद; रॅप-अप पार्टीत कलाकारांची धमाल

'KGF Chapter 2' चित्रपटाने पाचव्या आठवड्याच्या पहिल्या शुक्रवारी 2.32 कोटींची कमाई केली. यामध्ये हिंदी आवृत्तीचा हिस्सा 1.36 कोटी रुपये, कन्नड आवृत्तीचा वाटा 62 लाख रुपये आणि तामिळ आवृत्तीचा हिस्सा सुमारे 24 लाख रुपये होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com