KGF 2 ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर मोडला कमाईचा विक्रम

KGF 2 या दमदार चित्रपटाने सिनेमागृहांमध्ये धुमाकूळ घातला आहे.
KGF 2 First Day Box Office Collection
KGF 2 First Day Box Office CollectionDainik Gomantak

लोकांच्या मनात 'केजीएफ' चित्रपटाची प्रचंड क्रेझ होती. या चित्रपटाचा सिक्कवल 'KGF 2' रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी लोक चित्रपटगृहांकडे वळले आहेत. या दमदार चित्रपटाने (Movie) सिनेमागृहांमध्ये धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाचा पहिला भाग पाहिल्यानंतर प्रेक्षकांना दुसरा भाग पाहण्याची खूप उत्सुकता होती. विशेष म्हणजे या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) आणि अभिनेत्री रवीना टंडन मुख्य भूमिकेत आहेत. (KGF 2 Movie News Updates)

'KGF 2' हा चित्रपट प्रशांत नील यांनी दिग्दर्शित केला आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपली जादू पसरवली आहे. दीडशे कोटींमध्ये बनलेल्या या चित्रपटाने व्यवसायाच्या वेगाने सर्वच चित्रपटांना मागे टाकले आहे. या चित्रपटाचा पहिला शो सकाळी सहा वाजता सुरू झाला आणि रात्रीपर्यंत चित्रपटगृहांबाहेर प्रेक्षकांची मोठी गर्दी होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 140 कोटींचा आकडा पार केला आहे.

KGF 2 First Day Box Office Collection
Alia Bhatt Mangalsutra: आलियाच्या मंगळसूत्राच्या डिझाइनमध्ये लपलाय रणबीरचा लकी नंबर

दुसरीकडे, जर आपण फक्त त्याच्या हिंदी आवृत्तीच्या व्यवसायाबद्दल बोललो, तर सुरुवातीच्या ट्रेंडनुसार, या चित्रपटाने हिंदी पट्ट्यातून एकूण 53 कोटींचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटाने तामिळ भाषेतून सुमारे 11 कोटी रुपये कमावले आहेत, तर तेलगूमधून चित्रपटाला 30 कोटी रुपये मिळाले आहेत. दुसरीकडे, या चित्रपटाच्या कन्नड बेल्टच्या कलेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, या चित्रपटाने एकूण 36 कोटींची कमाई केली आहे. त्याचवेळी मल्याळममधून केवळ सात कोटी रुपये मिळाले. या चित्रपटात यशसोबत संजय दत्तही अॅक्शन मोडमध्ये आहे. जो त्याच्या चाहत्यांना त्याच्याकडे आकर्षित करत आहे. लोकांना हा चित्रपट खूप आवडला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com