KGF 2ची OTTवर दहशत, निर्मात्यांनी केली 320 कोटींची डील

KGF Chapter 2 ने रिलीज होताच पहिल्या वीकेंडमध्ये 552 कोटींची कमाई केली
KGF 2ची OTTवर दहशत, निर्मात्यांनी केली 320 कोटींची डील
KGF-2 Dainik Gomantak

कन्नड चित्रपट KGF 2 दररोज नवनवे विक्रम आपल्या नावे करत आहे. 14 एप्रिल रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाने दररोज काही ना काही विक्रम केले आहेत. आता या यादीत आणखी एका विक्रमाची भर पडली आहे. OTT प्लॅटफॉर्मने KGF 2चे अधिकार विक्रमी रकमेत विकत घेतले आहेत. (KGF 2 on OTT)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाचे ओटीटी अधिकार 320 कोटी रुपयांना विकले गेले आहेत. 27 मे पासून हा चित्रपट OTT वर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध असेल. या करारानंतर रॉकी भाईचा अभिनय मोठ्या पडद्यावर पाहिल्यानंतर चाहत्यांना त्यांच्या मिनी स्क्रीनवर देखील चित्रपटाचा आनंद घेता येणार हे निश्चित आहे. KGF 2 हा चौथा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे ज्याने आतापर्यंत 1000 कोटींहून अधिक कमाई केली आहे.

KGF-2
विकी कौशलने लग्नाच्या प्रश्नावर दिलं दिलखुलास उत्तर

KGF हा कन्नड चित्रपट उद्योगातील एकमेव सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. याआधी कोणताही चित्रपट 1000 कोटींचा टप्पा गाठू शकला नव्हता. KGF Chapter 2 ने रिलीज होताच पहिल्या वीकेंडमध्ये 552 कोटींची कमाई करत यशाची पताका लावली होती. चित्रपटाचे बजेट 100 कोटी रुपये होते आणि 1000 कोटींच्या पुढे गेलेले कलेक्शन अजूनही सुरू आहे.

KGF-2
Khatron Ke Khiladi 12 : रुबिना दिलीक, चेतना पांडे यांच्यानंतर राजीव अदातियाच्या नावावर शिक्कामोर्तब

या चित्रपटात यशने रॉकीची मुख्य भूमिका साकारली होती. यात श्रीनिधी शेट्टी, संजय दत्त, रवीना टंडन, अर्चना जोइस आणि प्रकाश राज यांनी चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केले आहे. या चित्रपटाचा पहिला भाग 2018 मध्ये रिलीज झाला होता. जो सुपरहिट चित्रपट ठरला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.