आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'खिसा' ला स्थान

Khisa Selection at International Film Festival
Khisa Selection at International Film Festival

मुंबई: कैलास वाघमारे लिखित ‘खिसा’ या मराठी शॉर्टफिल्मची ५१ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड झाली आहे.  अनेक चित्रपटांसोबत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांवर आपली मोहोर उमटवणाऱ्या चित्रपटांपैकी खिसा हा माराठी चित्रपट एक ठरला आहे.  १६ ते २४ जानेवारी २०२१ दरम्यान हा महोत्सव गोव्यात होणार आहे. या चित्रपटाचे संपूर्ण शूटींग विदर्भातील अकोला येथे झाले आहे. लालटिप्पा निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन राज प्रीतम मोरे यांनी केले असून प्रॉडक्शन, पी.पी. सिने  मुंबई यांचे आहे

काय आहे खिसा चा पार्शवभूमी?

देशाच्या सामाजिक वातावरणावर आणि खेडेगावातील संकुचित असलेल्या दृष्टिकोनावर बोलणारी खिसा ही कथा आहे. "महाराष्ट्रातील  लहान गावात इतर मुलांच्या खिशापेक्षा मोठा खिसा शिवून घेणाऱ्या मुलाची खिशात न मावणारी कथा म्हणजे ‘खिसा’ मन हेलावून टाकणारी ही कथा आहे,” असं वक्तव्य चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी केल आहे. १० व्या दादासाहेब फाळके चित्रपट महोत्सवात ‘खिसा’ने सर्वोत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार प्राप्त केला आहे,तर इस्तंबूल फिल्म अवॉर्ड्स २०२० मध्ये याच चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट पटकथा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

'खिसा' ची या मोहोत्सवात झाली निवड

व्या कोलकाता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल कॅनडाच्या मॉन्ट्रियल इंडिपेंडंट फिल्म फेस्टिव्हल, जयपूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, डायोरोमा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, ब्युनोस आयर्स, येथील महोत्सवांत ‘खिसा’ची अधिकृत निवड करण्यात आली आहे.

कोण आहे मुख्य भूमिकेत?

या शॉर्टफिल्ममध्ये कैलास वाघमारे, मीनाक्षी राठोड, श्रुती मधीदीप, डॉ. शेषपाल गणवीर आणि वेदांत श्रीसागर यांच्या भूमिका आहे. या चित्रपटाला पारिजात चक्रवर्ती यांनी संगीत दिले आहे. आणि सिमरजितसिंह सुमन यांनी फोटोग्राफीचे दिग्दर्शन या चित्रपटासाठी केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com