सिद्धार्थ मल्होत्रासोबतच्या ब्रेकअपवर बोलताना कियारा अडवाणी म्हणाली....

माझ्या वैयक्तिक आयुष्याविषयी अफवा निर्माण केल्या जातात तेव्हा मला वाईट वाटते : कियारा अडवाणी
सिद्धार्थ मल्होत्रासोबतच्या ब्रेकअपवर बोलताना कियारा अडवाणी म्हणाली....
Kiara Advani and Sidharth MalhotraDainik Gomantak

गेल्या काही दिवसांपासून कियारा अडवाणी अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबतच्या ब्रेकअपमुळे चर्चेत आहे. दोघांमधील प्रेम संपुष्टात आल्याचे बोलले जात होते. मात्र, नंतर दोघांमधील वाढत्या जवळिकीमुळे चाहते खुश दिसत होते. आजकाल कियारा अडवाणी तिच्या आगामी 'जुग जुग जिओ' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सतत मीडियाला मुलाखती देत ​​आहे. दरम्यान, कियाराने सिद्धार्थ मल्होत्रासोबतच्या ब्रेकअपवर मौन सोडले.

Kiara Advani and Sidharth Malhotra
प्रियांका चोप्राच्या मुलीशी संबंधी हे सिक्रेट तुम्हाला माहितीयं का?

अभिनेत्री कीरा अडवाणीने दिली प्रतिक्रिया

कियारा अडवाणी म्हणाली, "मी अशा गोष्टींकडे लक्ष न देण्याचा प्रयत्न करते, विशेषत: जेव्हा त्या गोष्टी माझ्या वैयक्तिक आयुष्याशी निगडीत असतात. माझ्या वैयक्तिक आयुष्याविषयी अफवा निर्माण केल्या जातात तेव्हा मला वाईट वाटते आणि आश्चर्य वाटते की या गोष्टी कुठून येत आहेत."

कियारा अडवाणी पुढे म्हणते, "दिवसाच्या शेवटी तुमचे काम पाहिले जाते. अशा स्थितीत तुम्हाला वाटते की, कामाव्यतिरिक्त तुमच्या आयुष्याशी संबंधित इतर गोष्टी समोर येऊ नयेत. मात्र, आपण याबद्दल काहीही करू शकत नाही. या गोष्टींचा आपल्याला त्रास होऊ नये म्हणून आपण आंधळे व्हावे. तुम्ही जितकी जास्त प्रतिक्रिया द्याल तितकी जास्त चर्चा होईल. एवढा तिखट मसाला लावून बोलणारे हे सूत्र कोण आहेत?"

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com