किम कार्दशियन नव्या वादाच्या भोवऱ्यात; हिंदूच्या भावना दुखावल्याचा आरोप

गोमंन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 27 मे 2021

किमने ओम हे धार्मिक चिन्ह असलेले कानातले घातले आहे.

हॉलिवूडमधील (Hollywood) प्रसिध्द अभिनेत्री किम कार्दशियन(Kim Kardashian) तिच्या अभिनयापेक्षा चित्रविचित्र पेहराव, वादग्रस्त वक्तव्य आणि बोल्ड फोटोशूटमुळे सतत चर्चेत असते. यावेळी किमवर हिंदूच्या (Hindu) भावना दुखावल्याचा आरोप केला जात आहे. किमने नुकतचं फोटोशूट केलं आहे. तिने तिचे काही फोटो सोशल मिडियावरील ट्विटर आकाऊंटवरुन शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती गुलाबी रंगाच्या बेडवर असलेली पाहायला मिळत आहे. लाल रंगाचा प्रिटेड ड्रेस किमने परिधान केला आहे. त्यासबोतच किमने ओम हे धार्मिक चिन्ह असलेले कानातले घातले आहे. यामुळे किमला चांगलचं सोशल मिडियावर ट्रोल केलं जात आहे. (Kim Kardashian in the midst of a new controversy Accused of hurting Hindu sentiments)

किमचा हा फोटो सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोमुळे किमला नेटीझन्सकडून ट्रोलही केलं जात आहे. काही नेटकऱ्यांचे म्हणणे आहे की, किमने परिधान केलेले कानातले हे हिंदू धर्माचे प्रतिक आहे. जे अशाप्रकारे परिधान केले जाऊ शकत नाही.  एक नेटकरी म्हणाला, ''ओम हे हिंदूसाठी एक पवित्र प्रतिक आहे आणि ते फक्त कानातले घालण्यासाठी नाही, आणि हे सांगण्यासाठी हा चांगला काळ आहे का?''  तर दुसरा नेटकरी म्हणाला, ''हे सेलिब्रिटी सांस्कृतिक प्रतिके वापरणे कधी थांबवतील? हे खूप लाजिरवानं आहे,''  अशा अनेक प्रकारच्या कमेंट करत नेटकऱ्यांनी किमवर निशाणा साधला.

Jawaharlal Nehru Death Anniversary: बॉलिवूडच्या या प्रमुख कलाकारांनी साकारली...

गेल्या वर्षी मांग टिका आणि हातात सोन्याच्या बांगड्या घालून फोटोशूट केल्यामुळे किमला ट्रोल केलं गेलं होतं. एवढच नाही किमच्या घटस्फोटाच्या मुद्द्यावरुनही बरीच चर्चा रंगली होती. किम कार्दशियन आणि अभिनेता कान्ये वेस्ट यांनी 19 फेब्रुवारी 2020 रोजी घटस्फोटासाठी अर्ज केला होता. कान्ये वेस्ट आणि किमकडून मुलांच्या संयुक्त ताब्याची मागणी करण्यात आली आहे. 

संबंधित बातम्या