Kirron Kher B'day Special: किरण अन् अनुपम खेर यांची अजब-गजब प्रेमकहाणी

Kirron Kher Anupam Kher Love Story: अनुपम खेर आणि किरण खेर यांची लव्हस्टोरी खूपच क्यूट आहे.
Kirron Kher B'day Special: किरण अन् अनुपम खेर यांची अजब-गजब प्रेमकहाणी
Kirron Kher Anupam Kher Love StoryDainik Gomantak

बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री किरण खेर आज तिचा 70 वा वाढदिवस साजरा करत आहे. किरण खेर यांनी आपल्या अभिनयाने इंडस्ट्रीत एक वेगळी छाप पाडली आहे. किरण खेरने बहुतेक चित्रपटांमध्ये आईची भूमिका साकारली आहे. ती तिच्या प्रत्येक भुमिका सुंदरपणे साकारते. ज्यामुळे प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. किरण खेरही त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. किरण खेर आणि अनुपम खेर हे बॉलीवूडमधील क्यूट कपल्सपैकी एक आहेत. त्याची लव्ह स्टोरी ही त्याच्यासारखीच क्यूट आहे. आज किरण खेरच्या वाढदिवसानिमित्त जाणुन घेउया त्यांच्या प्रेमकहाणीबद्दल (Kirron Kher Anupam Kher Love Story News)

किरण (Kirron Kher) आणि अनुपम खेर यांची चंदीगडमध्ये भेट झाली. त्यावेळी दोघेही तिथे थिएटरमध्ये काम करायचे. रंगभूमीवर असताना दोघेही खूप चांगले मित्र बनले होते. पण ही मैत्री पुढे प्रेमाचे रूप घेईल कोणास ठाऊक. थिएटरनंतर किरण चित्रपटात (Movie) काम करण्यासाठी मुंबईत आले होते. तिथे तिने बिझनेसमन गौतम बेरी यांच्याशी लग्न केले. दोघांनाही एक मुलगा होता, त्याचे नाव सिकंदर. पण किरण आणि गौतम यांचे नाते फार काळ टिकले नाही.

Kirron Kher Anupam Kher Love Story
सुशांत सिंग राजपूतच्या आठवणीत रिया चक्रवर्ती झाली भावूक

किरण आणि अनुपम आपल्या विवाहित जावनात आंनदी नव्हते. दोघंही त्यांच्या नात्याशी झुंज देत थिएटरमध्ये काम करत होते. त्यादरम्यान दोघेही एका नाटकासाठी कोलकात्यात गेले होते. जिथे दोघे पुन्हा भेटले. त्यादरम्यान दोघांनाही एकमेकांवरील प्रेमाची जाणीव झाली.

अनुपम खेर यांनी आपल्या मनातील भावना सर्वात पहिले किरणला सांगितली. त्यावेळी किरणलाही त्यांच्या मैत्रीचे रूपांतर कुठेतरी प्रेमात झाल्याचे जाणवले. किरण यांनी पतीला घटस्फोट दिला आणि अनुपम यांनी त्यांच्या पत्नीला घटस्फोट दिला. अनुपम आणि किरण यांनी 1985 मध्ये लग्नगाठ बाधंली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com