Shamshera: रणबीरचा 'समशेरा' बॉक्स ऑफिसवर ढेर, जाणून घ्या आत्तापर्यंतचे कलेक्शन

Shamshera |Ranbir Kapoor News| Bollywood News Updates
Shamshera |Ranbir Kapoor News| Bollywood News Updates Dainik Gomantak

रणबीर कपूरचा ‘शमशेरा’ (Shamshera) या चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा झाली. त्याच्या या चित्रपटाकडून लोकांना खूप अपेक्षा होत्या. पण, चित्रपटगृहात शमशेरा प्रदर्शित झाल्यावर काही खास कमाल करू शकला नाही. रणबीर कपूर (Ranbir Kapoor), संजय दत्त (Sanjay Dutt), वाणी कपूर (Vani Kapoor) अशी बडी स्टारकास्ट असलेल्या शमशेराचे बॉक्स ऑफिस (Box Office collection) कलेक्शनही काही खास झाले नाही.

Shamshera |Ranbir Kapoor News| Bollywood News Updates
विधानसभेत विरोधकांची भूमिका संशयास्पद!

चित्रपट प्रदर्शित झाला त्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर (Box Office) फक्त 10.25 कोटींचे कलेक्शन केले. यानंतरही शनिवार-रविवारी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये फार काही वाढ झाली नाही. शनिवारी 10.50 कोटी आणि रविवारी 11 कोटी कमवत चित्रपटाचे वीकेंड कलेक्शन 31.75 कोटींवर पोहोचले आहे. मंगळवारी चित्रपटाने केवळ 2.4 कोटी रूपयांची कमाई केली आहे. समिक्षकांना वाटते की समशेरा जास्तीत जास्त पन्नास कोटी रूपये कमवू शकेल.

‘शमशेरा’चे ओपनिंग वीकेंड कलेक्शन 2022 च्या टॉप 5 मध्येही नाही. या चित्रपटाकडून रणबीरसह प्रेक्षकांना खूप जास्त अपेक्षा होत्या. दरम्यान, कार्तिक आर्यनच्या (Kartik Aryan) ‘भूल भुलैया 2’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. 2022 मधील टॉप वीकेंड कलेक्शनमध्ये ‘भूल भुलैया 2’ हा चित्रपट आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com