IFFIतून कोंकणी सिनेमा पोहोचावा राज्यभरात

गोव्यामध्ये गावागावांत सिनेमा तर इफ्फीने पोहोचवला पण तो नेमका कोणता? याबद्दल नक्कीच जाणून घेतले पाहिजे .
IFFIतून कोंकणी सिनेमा पोहोचावा राज्यभरात
IFFIतून कोंकणी सिनेमा पोहोचावा राज्यभरातDainik Gomantak

गोव्यात 17 वर्षांपूर्वी जेंव्हा मनोहर पर्रीकर यांनी इफ्फी आणला तेंव्हा त्यांना इथून असलेली एकूण अपेक्षा आणि आजचे वास्तव यात खूपच फरक आहे. कारण गोव्यामध्ये सिनेसंस्कृती  रुजावी आणि त्यामाध्यमातून इथे उत्तमोत्तम सिनेमे तयार व्हावेत त्याचवेळी आंतरराष्टीय स्तरावर गोव्याची सिनेवर्तुळात  विशेष ओळख व्हावी, अशी त्यांची धारणा होती. पण या सगळ्या मधल्या काळात इफ्फी ज्या पद्धतीने आता दिसतो आहे. त्यातून पर्रीकरांचे स्वप्न अपूर्णच राहिलेले  दिसते आहे.

गोव्यामध्ये गावागावांत सिनेमा तर इफ्फीने पोहोचवला  पण तो नेमका कोणता? याबद्दल नक्कीच  जाणून घेतले पाहिजे कारण स्थानिक कोंकणी  सिनेमांना इफ्फीमुळे  गावात पोहोचवण्याची संधी सरकारकडे होती, पण ती संधी त्यांनी कधीच साधली नाही. परकीय भाषेतील सिनेमे राज्यातील गावखेड्यामध्ये  किती समजतील  हे समजून  न घेता त्याच सिनेमांचा पाठपुरावा करण्यात आला. यामुळे आपल्याच  घरामध्ये कोंकणी  सिनेमा उपरा झाला.

IFFIतून कोंकणी सिनेमा पोहोचावा राज्यभरात
ही बॉलीवूड अभिनेत्री आहे रोहित शर्मा पेक्षाही आक्रमक फलंदाज, पाहा व्हिडिओ

आपल्या राज्यात अनेक अडथळ्यांवर मात करत विविध सिनेनिर्माते आपापल्या परीने उत्तम सिनेमे तयार करत आहेत. इफ्फीने या सिनेकर्मीना, त्यांच्या सिनेमांना मानाचे आणि हक्काचे स्थान दिले पाहिजे. त्यांना अधिकाधिक सिनेनिर्मितीसाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. गोवा मनोरंजन सोसायटी तर एखाद्या वार्षिक उत्सवासारखे  इफ्फीकडे बघते. या संस्थेच्या माध्यमातून वर्षभर काही ना काही सिनेमाशी निगडित कार्यक्रम करता येऊ शकतात. पण त्याकडे कोणीच लक्ष देत नाही. तीच गोष्ट सरकारच्यावतीने देण्यात येणाऱ्या सिने अनुदान योजनेबद्दल. गेल्या 5/6 वर्षांपासून या योजनेचे काय झाले ते कोणालाच कळत नाही. मधल्या काळात कोणत्याच  सिनेनिर्मात्याला  या योजनेतून पैसे मिळाल्याचे ऐकले नाही. वास्तविक इएसजीने असे ठरवले पाहिजे कि, गोव्यात तयार होणाऱ्या उत्तम सिनेमाला सानुग्रह अनुदान दिले पाहिजे त्याचपप्रमाणे राज्यात तसेच देशातील अन्य राज्यांत सदर सिनेमाचे विशेष खेळ आयोजित केले पाहिजेत. तसेच राज्यातील सगळ्या सिनेगृहामध्ये कोंकणी सिनेमासाठी विशेष वेळ राखून ठेवलीच पाहिजे. सरकार जेवढ्या प्रकारे नव्या सिनेकर्मीना प्रोत्साहन देईल तेवढे राज्यातील सिनेवाटचालीला प्रोत्साहन मिळेल.  - शब्दांकन : किशोर अर्जुन

वास्तविक 'डिकॉस्टा हाऊस'ची पटकथा 3 वर्षांपूर्वी लिहिली होती.  यावर हिंदी सिनेमा करण्याचे आम्ही योजत होतो.  पण मधल्या काळात कोरोना आला आणि सगळीच गणिते बिघडली. त्यामुळे आम्ही मग सदर सिनेमा कोंकणी  भाषेत करण्यासाठी घेतला. सिनेमाची संकल्पना घेऊन जेंव्हा आम्ही निर्मात्या डॉ. प्रमोद साळगावकर याना भेटलो तेंव्हा त्यांना गोष्ट खूपच आवडली आणि त्यांनी सिनेमाची निर्मिती करण्यासाठी हिरवा कंदील दिला. कोरोना काळात जिथे अनेकांनी विविध कारणांनी आपले सिनेप्रकल्प अर्धवट ठेवले तिथे डॉ. प्रमोद साळगांवकर या मात्र आमच्यासोबत खंबीरपणे उभ्या राहिल्या. आज जेंव्हा सिनेमा पूर्ण होऊन इफ्फिमध्ये प्रीमिअर विभागात जर प्रकशित होत आहे तेंव्हा मला हे सांगायला खूपच अभिमान वाटतो कि 'डिकॉस्टा हाऊस' हा 99 टक्के गोमंतकीय आहे. या सिनेमातील सगळे कलाकार आणि तंत्रज्ञ हे गोमंतकीय आहेत. फक्त या सिनेमाच्या साउंडचे काम आम्ही मुंबईमध्ये केले आहे. म्हणजेच संपूर्णतः गोव्यामध्ये सिनेमाची निर्मिती होऊ शकते हेदेखील यातून सिद्ध झाले आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com