'अदर पूनावाला ऐवजी मी रामदेव बाबां यांची कोरोनाची लस घेणार'

दैनिक गोमन्तक
बुधवार, 6 जानेवारी 2021

अदर पूनावाला यांच्या 1000 रूपयांच्या लसीऐवजी बाबा रामदे यांची केवळ 22 रूपयात उपलब्ध असलेली लस घेणार आहे. हा निर्णय मी  यासाठी घेतला आहे ​

मुंबई: अभिनेता कमल आर खान आपल्या ट्विटमुळे बर्‍याचदा चर्चेत राहतो. अलीकडेच त्यांनी एनसीबीने बॉलिवूड सेलिब्रिटींच्या चौकशीविषयीही ट्विट केले होते, जे खूप व्हायरल झाले. कमलने आता कोरोना लसीबद्दल एक ट्विट केले असून ते जोरदार व्हायरल होत आहे. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले आहे की ते अदर पूनावाला ऐवजी रामदेव बाबांची कोरोनाची लस घेणार. त्यांनी ट्वीट करून लिहिले की, अदर पूनावाला यांच्या 1000 रूपयांच्या लसीऐवजी बाबा रामदे यांची केवळ 22 रूपयात उपलब्ध असलेली लस घेणार आहे. हा निर्णय मी  यासाठी घेतला आहे कारण दोन्ही लस सारख्याच आहेत’  अशा आशयाचे ट्विट केआरकेने केले आहे.

 

कमल आर खानच्या ट्वीटवर बर्‍याचदा मजेदार कमेंट्स पाहायला मिळतात. सध्या सोशल मीडियावर केआरकेचे हे ट्विट व्हायरल झाले आहे. या चाहत्यांकडून मजेदार कमेंट्स घेत आहेत, लोक विनोदही करत आहेत कारण ते बाबा रामदेवच्या औषधाचे वर्णन कोरोना लस म्हणून करतात. ट्विटवर अनेकजण प्रतिक्रिया देत असून केआरकेला ट्रोल करत आहेत.

आणखी वाचा:

बिग बीं लडाखवरून लगेच का परतले? -

 

संबंधित बातम्या