‘टर्री’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; ललित प्रभाकर दिसणार डॅशींग लूकमध्ये

 Lalit Prabhakars Terry to hit the screens soon
Lalit Prabhakars Terry to hit the screens soon

मुंबई: जुळून येती रेशीमगाठी या मराठी मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अभिनेता म्हणजे ललित प्रभाकर. अगदी  कमी वेळात ललितने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. तर, तो अनेकींच्या गळ्यातलं ताईत सुद्धा झाला. या लोकप्रियतेमूळेच हा अभिनेता रुपेरी पडद्यावरच सुद्धा बघायला मिळतो. लवकरच ललित प्रभाकरचा टर्री हा नव्या दमाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यापूर्वी या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शीत झालं आहे.

ललितने त्यांच्या इन्स्टाग्रामवर या चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे. या प्रदर्शित झालेल्या मोशन पोस्टरकडे बघितल्यानंतर एखाद्या बॉलिवूड किंवा हॉलिवूड चित्रपटाची आठवण येते. या चित्रपटातून बिनधास्त, बेधडक, मनसोक्त रमणआरी , गमणारी  तरुणाईची गोष्ट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं दिसून येत आहे.

टर्री या चित्रपटातून एक नव्या विषयावर भाष्य करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. परंतु या चित्रपटाविषयी सध्या कोणत्याही गोष्टींचा खुलासा करण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे त्याच्या या चित्रपटाचं नाव ऐकून प्रेक्षकांना प्रश्न पडले आहेत. ‘टर्री’ म्हणजे नेमकं काय? हा एकच प्रश्न प्रेक्षकांच्या डोक्यात फिरत आहे.

‘टर्री’ म्हणजे काय?

‘टर्री’ म्हणजे बेधडक. सळसळत्या रक्ताचा तरुण, प्रचंड ऊर्जा असलेला, बेफिकीर, असा याचा अर्थ आहे. टेररबाज वृत्तीचा आणि काहीही करण्याची धमक असलेला, समाजाच्या विरुद्ध जाऊन बंडखोरी करण्याची ताकद अंगात असलेला एक डॅशिंग तरुण म्हणजे ‘टर्री’… खरं म्हणजे ग्रामीण भागात अशाप्रकारच्या शब्दाचा बोलीभाषेत वापर केला जातो. एखादा बेधडक आणि आगाऊ मुलगा दिसला की, त्याला ‘टर्रीबाज’ म्हटलं जातं. त्यामुळेच पहिल्याच भेटीत या धडाकेबाज मराठी ‘टर्री’ सिनेमाचं मोशन पोस्टर प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे.

कधी येणार पडद्यावर?

मराठी सिनेसृष्टीतील सगळ्यांचा आघाडता डॅशिंग स्टार ललित प्रभाकर या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. प्रतीक चव्हाण, अक्षय आढळराव पाटील आणि विक्रम धाकतोडे या सिनेमाचे निर्माते आहेत. ‘ऑन युव्हर स्पॉट प्रॅाडक्शनने ‘प्रियामो एन्टरटेन्मेंट’च्या सहयोगानं ‘टर्री’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. महेश रावसाहेब काळे यांनी आपल्या रांगड्या शैलीत या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. येणाऱ्या वर्षात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com